मुंबई -बॉलीवूड अभिनेता अर्जुन कपूरला कोरोनाची बाधा झाली आहे. त्याने स्वत: इन्स्टाग्राम पोस्टद्वारे याबाबत माहिती दिली. त्याला कोरोनाची तीव्र लक्षणे नसून त्याची प्रकृती ठिक आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तो गृहविलगीकरणातच राहणार आहे, असेही अर्जुनने सांगितले.
आपल्या तब्येतीविषयी अपडेट देत राहण्याचे आश्वासन अर्जुनने चाहत्यांना दिले. सध्याची कोरोनाची परिस्थिती सर्वांची परीक्षा पाहणारी आहे. मात्र, आपण सर्वजण या संकटावर लवकरच मात करू, असा विश्वास त्याने व्यक्त केला.