महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बोगस औषधांची विक्री करणारा अटकेत; मुंबईतील टिळक नगर पोलिसांची कारवाई - Bogus remdesivir Sale Mumbai

कोरोनाच्या काळात वैद्यकीय व्यवस्थेवर प्रचंड ताण आला आहे. ऑक्सिजनचा तुटवडा, रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा, प्लाज्माची कमतरता या सगळ्या अडचणीत आरोग्य यंत्रणा रुग्णांना बरे करण्याचा प्रयत्न करत आहे. अशात बोगस औषधांचा काळाबाजार सुरू असल्याचा प्रकार समोर आला आहे.

प्रतिकात्मक
प्रतिकात्मक

By

Published : Apr 22, 2021, 9:47 PM IST

मुंबई -कोरोनाच्या काळात वैद्यकीय व्यवस्थेवर प्रचंड ताण आला आहे. ऑक्सिजनचा तुटवडा, रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा, प्लाज्माची कमतरता या सगळ्या अडचणीत आरोग्य यंत्रणा रुग्णांना बरे करण्याचा प्रयत्न करत आहे. अशात बोगस औषधांचा काळाबाजार सुरू असल्याचा प्रकार समोर आला आहे. या सगळ्या प्रकाराचा भांडाफोड मुंबईतील टिळक नगर पोलिसांनी केला आहे. पोलिसांनी सापळा रचून रुपेश गुप्ता या बोगस औषधांचा काळाबाजार करणाऱ्या व्यक्तीला अटक केली आहे.

माहिती देताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील काळे

हेही वाचा -...म्हणून सरकारला राज्यात लावावा लागला कडक लॉकडाऊन!

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मेघना ठक्कर नावाच्या महिलेने कोविड काळात रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा असल्याने रुपेश गुप्ता नावाच्या एका व्यक्तीला फोनवरून संपर्क साधला आणि त्याच्याकडे रेमडेसिवीर औषधीची मागणी केली. गुप्ता याने सहा इंजेक्शन प्रत्येकी तीन हजार रुपयाला देण्याचे कबूल केले. ठक्कर यांनी आपल्या एका मित्राशी संपर्क करून त्याच्याद्वारे औषध मागवून घेतली. औषधांचा पार्सल घरी आल्यानंतर जेव्हा पाहिले तेव्हा त्या औषधांच्या बाटल्यांवर कोणतेही स्टिकर नव्हते किंवा सील नव्हते. या औषधांच्या बाटलीच्या आतमध्ये पांढऱ्या रंगाची पावडर होती. हे औषधांचे बॉक्स घेऊन मेघना ठक्कर यांनी थेट पोलीस स्टेशन गाठले आणि घडला प्रकार पोलिसांना सांगितला.

मेघना ठक्कर यांनी दिलेली माहिती खळबळजनक होती. पोलिसांनी लागलीच तपास चक्रे फिरवली. तपासाअंती पोलिसांनी रुपेश गुप्ता नावाच्या एका व्यक्तीला मुंबईपासून दूर पालघर जिल्ह्यातून अटक केली. पालघरमध्ये आणखीन काही जण अशा स्वरुपाचा गोरखधंदा करत असल्याची माहिती पोलिसांना आहे. पोलीस आता गुप्ताच्या अन्य साथीदारांना अटक करणार आहेत. गुप्ताने तब्बल 29 जणांना बोगस औषधी दिल्याचे पोलिसांकडून समजले. ज्यांनी रुपेश गुप्ताकडून औषधी घेतलीत त्यांनी टिळक नगर पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

हेही वाचा -'राज्यातील 18 वर्षावरील सर्व नागरिकांचे लसीकरण करावे'

ABOUT THE AUTHOR

...view details