मुंबई- newborn girls body in toilet waste : नुकतीच जन्मलेली मुलगी नकोशी झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मुंबईच्या सायन येथील महापालिका रुग्णालयात शौचालयाच्या कचऱ्यात नवजात मुलीचा मृतदेह सापडला. या संदर्भात सायन पोलीस ठाणे आता पुढील तपास करीत आहे. मात्र, मुलीचा मृतदेह सापडण्यानं अनेक प्रश्नांना जन्म दिला आहे.
मुंबईच्या सायन रुग्णालयात नुकत्याच जन्मलेल्या मुलीला शौचालयाच्या कचऱ्यात टाकून देण्याचा प्रकार घडला आहे. हा प्रकार मध्यरात्री झालेला असून काही व्यक्ती शौचालयात गेल्या असताना त्यांच्या निदर्शनास ही बाब आली. साफसफाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांना याची माहिती मिळताच एका नुकत्याच जन्मलेल्या मुलीचा की मुलाचा मृतदेह आहे, याबद्दल संशय आला. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी रुग्णालयातील डॉक्टरांपर्यंत याची माहिती तात्काळ कळवली. उपस्थित डॉक्टरांनी तपासणी करुन हा नुकत्याच जन्मलेल्या मुलीचा मृतदेह असल्याचे घोषित केले. परंतु कायदेशीर प्रक्रिया पार पा़डण्याकरिता सायन पोलीस ठाणे यांना याबाबत कळवण्यात आले.
अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल-रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी सायन पोलीस ठाणे यांच्याकडे याची माहिती दिली. मुंबईच्या सायन पोलीस ठाण्यामध्ये यासंदर्भात आठ डिसेंबर रोजी याबाबत तक्रार दाखल झाली. त्यानंतर सायन पोलिसांनी रुग्णालयात प्रत्यक्ष घटनास्थळी भेट दिली. पोलीस अधिकारी यांनी या संदर्भात नवजात बालिकेचा मृतदेह शौचालयाच्या कचऱ्यात टाकून दिल्या संदर्भात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला.
सायन रुग्णालयाच्या एका शौचालयाच्या बाजूला कचऱ्यामध्ये नवजात जन्मलेल्या बाळाचा मृत्यू काही व्यक्तींना आढळला. सायन रुग्णालयाकडून डॉक्टरांनी पोलिसांकडे या संदर्भात तक्रार केली. डॉक्टरांच्या टीमने नुकत्याच जन्मलेले बाळ म्हणजे मुलगी असल्याचे वैद्यकीय तपासणीनंतर सांगितले. सायन पोलीस ठाणे याचा तपास करीत आहे-सायन पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनीषा शिर्के