महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Body Bag Scam Case: बॉडी बॅग घोटाळा प्रकरणात महापौर किशोरी पेडणेकर यांची पुन्हा शुक्रवारी होणार चौकशी - अग्रीपाडा पोलीस स्टेशन

Body Bag Scam Case: कोविड काळात मुंबई महानगर पालिकेने खरेदी केलेल्या बॉडी बॅग्समध्ये झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांची सोमवारी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने दोन तास चौकशी केली होती. आज पुन्हा त्यांना चौकशीसाठी बोलावल्यानंतर पोलिसांनी दोन तास चौकशी केली. त्यांना पुन्हा शुक्रवारी चौकशीसाठी बोलाविण्यात आलयं.

Body Bag Scam Case
माजी महापौर किशोरी पेडणेकर यांची चौकशी

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 13, 2023, 12:07 PM IST

Updated : Sep 13, 2023, 9:08 PM IST

मुंबई : Body Bag Scam Case: कोविड काळात बॉडी बॅगघोटाळाप्रकरणी मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर या आर्थिक गुन्हे शाखेच्या चौकशीच्या जाळ्यात अडकल्या आहेत. दोन दिवसांपूर्वीच किशोरी पेडणेकर यांची आर्थिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात दोन तास चौकशी करण्यात आली होती. आज पुन्हा त्यांना चौकशीसाठी बोलावलं असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. आज सकाळी ११ वाजताच्या सुमारास किशोरी पेडणेकर यांना पुन्हा चौकशीसाठी बोलावण्यात आलं. पोलिसांनी त्यांची दोन तास चौकशी केलीय.

किशोरी पेडणेकर यांच्यावर गुन्हा दाखल :कोविडमुळे मृत्यू झालेल्या लोकांना नेण्यासाठी मुंबई महापालिकेने बॉडी बॅग्सची खरेदी केली होती. मात्र, त्यात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप झाल्यानंतर याप्रकरणी किशोरी पेडणेकर आणि महापालिकेच्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांविरोधात मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी अटकेची शक्यता वर्तवण्यात होती. मात्र, किशोरी पेडणेकर यांनी उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली होती. ४ सप्टेंबरला न्यायालयाने त्यांना चार आठवड्यासाठी अटकेपासून संरक्षण दिलं. तसंच, ११ सप्टेंबर, १३ सप्टेंबर व १६ सप्टेंबरला पेडणेकर यांना आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांतर्फे होणाऱ्या चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितलं.

कोविड बॉडी बॅग घोटाळा : महिन्याभरापूर्वी ईडीने किशोरी पेडणेकरांविरोधातील आरोप प्रकरणाची कागदपत्रे मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे विभागाकडून मागवली होती. या विभागाकडून पेडणेकरांवर गुन्हा ही दाखल करण्यात आला होता. याच गुन्ह्याच्या आधारे कागदपत्रे तपासल्यानंतर ईडीनं किशोरी पेडणेकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पेडणेकरांवर आरोप काय?: कोविड काळात मुंबई महापालिकेकडून पालिकेच्या रुग्णालयांसाठी मृतदेहांच्या बॅग खरेदी करताना १८०० रुपयांची एक बॅग ६८०० रुपयांना विकत घेतल्याचं सांगितलं जातंय. किशोरी पेडणेकर यांच्या सुचनेनुसार हा व्यवहार झाल्याचा आरोप करण्यात आला. तर आर्थिक गुन्हे विभागाकडून कथित आरोपांनंतर मुंबईतील आग्रीपाडा पोलीस ठाण्यात (Agripada Police Station) ५ ऑगस्ट २०२३ ला किशोरी पेडणेकर यांच्याविरोधात कलम ४२० अंतर्गत फसवणुकीचा गुन्हा तर कलम १२० ब अंतर्गत जाणीवपूर्वक कारस्थान करुन घोटाळा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. महापालिकेत कोविड काळात कथित चार मोठे घोटाळे झाल्याचे आरोप असून त्यांपैकी बॉडी बॅग घोटाळा एक आहे.

हेही वाचा -

  1. Kishori Pednekar News : ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकरांची आर्थिक गुन्हे शाखेकडून दोन तास चौकशी, नेमक प्रकरण काय?
  2. Body Bag Scam Case : कोविड बॉडी बॅग प्रकरण; किशोरी पेडणेकर यांच्या अडचणी वाढल्या, ED कडून गुन्हा दाखल
  3. Body Bag Scam Case : कोरोना बॉडीबॅग प्रकरणी किशोरी पेडणेकरांना मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा
Last Updated : Sep 13, 2023, 9:08 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details