महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

दहावीचा पेपर रद्द केला, पण गुण कसे द्यायचे ? शिक्षण मंडळापुढे पेचप्रसंग

नववी आणि अकरावी या दोन्ही वर्गातील विद्यार्थ्यांच्या पहिल्या सत्रामध्ये झालेल्या चाचण्या, प्रात्यक्षिके आणि अंतर्गत मुल्यमापण करून त्यांना पुढच्या वर्गात पाठविण्याचा, म्हणजेच मूल्यांकन करून त्यांना उत्तीर्ण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र दहावीच्या भूगोलचे गुण कसे द्यायचे, याचा कोणताही निर्णय होण्यापूर्वी शिक्षण मंत्र्यांनी हा पेपर रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला. यामुळे, राज्य शिक्षण मंडळाचे अधिकारी संकटात सापडले आहेत.

शिक्षण मंडळापुढे पेचप्रसंग
शिक्षण मंडळापुढे पेचप्रसंग

By

Published : Apr 13, 2020, 7:53 AM IST

मुंबई- कोरोनाच्या संकटामुळे दहावीचे भूगोल आणि कार्यशिक्षण हे दोन्ही पेपर रद्द करण्यात आले आहेत. मात्र, रद्द करण्यात आलेल्या भूगोलच्या पेपरला गुण कसे द्यायचे? असा प्रश्न शिक्षण मंडळाला पडला आहे. यावर येत्या काही दिवसात वरिष्ठ अधिकाऱ्यांची एक बैठक घेऊन निर्णय घेतला जाईल, अशी माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी नववी आणि अकरावीच्या परीक्षा तसेच दहावीचा भूगोलचा पेपरही रद्द झाल्याची घोषणा केली. त्यात नववी आणि अकरावी या दोन्ही वर्गातील विद्यार्थ्यांच्या पहिल्या सत्रामध्ये झालेल्या चाचण्या, प्रात्यक्षिके आणि अंतर्गत मुल्यमापण करून त्यांना पुढच्या वर्गात पाठविण्याचा, म्हणजेच मूल्यांकन करून त्यांना उत्तीर्ण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र दहावीच्या भूगोलचे गुण कसे द्यायचे, याचा कोणताही निर्णय होण्यापूर्वी शिक्षण मंत्र्यांनी हा पेपर रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला. यामुळे, राज्य शिक्षण मंडळाचे अधिकारी संकटात सापडले आहेत.

दुसरीकडे सरासरी गुण सरकार कसे देणार, यावरून विषय शिक्षक मॉडरेटर यांच्यामध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. त्यातच मंडळाकडून जर इतिहास विषयाला धरून सरासरी गुण दिले, तर एखाद्याला इतिहास विषय अवघड गेला असल्यास त्याला भूगोलातही कमी गुण मिळतील, असे विषय शिक्षकांचे म्हणणे आहे. तर राज्यात इंग्रजी माध्यमांच्या विद्यार्थ्यांना इतिहास हा विषय अवघड जातो. यामुळे गुण कमी पडल्यास अनेक विद्यार्थी नाराज होऊ शकतील तसेच काहीजण न्यायालयात जाण्याची शक्यता काही शिक्षकांनी व्यक्त केली.

कोरोनामुळे राज्य शिक्षण मंडळाच्या नऊ विभागीय मंडळात दहावीच्या परीक्षा पेपरचे मुल्यमापन पुर्णपणे झालेले नाही. बहुतांश ठिकाणी शिक्षकांच्या उत्तरपत्रिका शाळेतच आहेत. तर, ज्या शिक्षकांनी घरी उत्तरपत्रिका नेल्या व मूल्यांकन केलेले आहे, त्यांच्यापुढे या उत्तरपत्रिका परिक्षकांपर्यंत कशा पोहोचवायच्या असा प्रश्न पडला आहे. यामुळे लॉकडाऊन वाढल्यामुळे ही सर्व प्रक्रियाही रखडण्याची शक्यता आहे. अशात दहावीच्या भूगोलाच्या पेपरसाठी गुण पद्धत ठरविण्यासाठी अडचणी वाढण्याची शक्यता काही शिक्षकांनी व्यक्त केली.

ABOUT THE AUTHOR

...view details