मुंबई : गरीब आणि गरजू नागरिकांना घराजवळ दर्जेदार आणि मोफत आरोग्य सेवा देण्यासाठी हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आरोग्य केंद्र (Balasaheb Thackeray Health Center) सुरू करण्यात येत आहेत. मात्र झोपडपट्टी विभागात जागा उपलब्ध नसल्याने आता पालिकेने झोपडीतील घरे विकत घेण्याच्या निर्णय घेतला आहे. त्यासाठी संबंधित झोपडीधारकाला रेडिरेकनरनुसार पैसे देण्यात येतील, अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. संजीवकुमार यांनी (BMC will buy slum houses) दिली.
घराजवळ आरोग्य केंद्र :मुंबईत जागा उपलब्ध (land for health center) नसल्याने पालिकेने विभागवार ‘पोर्टा केबीन’ मध्ये आरोग्य केंद्रे सुरू केली आहेत. गोरगरीबांना घरापासून दहा ते १५ मिनिटांच्या अंतरावर उपचार मिळावेत, हा उद्देश महापालिकेचा आहे. आतापर्यंत ५२ ’पोर्टा केबीन’ आरोग्य केंद्रे सुरू करण्यात आले आहेत. पालिकेच्या महत्त्वाकांक्षी उपक्रमामुळे आरोग्य केंद्रासाठीच्या जागेचा प्रश्न मिटणार असून झोपडपट्टीतील घर विकणाऱयांनाही योग्य मोबदला मिळणार आहे. ही संख्या २५० पर्यंत वाढवण्याची घोषणा पालिका प्रशासनाकडून करण्यात आली (BMC will buy slum houses for health center) आहे. विशेषत: झोपडपट्टी भागासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. सद्यस्थितीत ५२ आरोग्य केंद्र कार्यान्वित करण्यात आले असून २६ जानेवारीपर्यंत आणखी १०० केंद्र सुरु करण्याचे उद्दीष्ट आहे.