महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुंबई पालिकेच्या वॉर रूमवर कोरोनाचा हल्ला, खासगीकरण होणार - मुंबई कोरोना वार रूम

मुंबईचे व्यवस्थापन पाहणाऱ्या महापालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागावरही कोरोनाने हल्ला केला आहे. यामुळे आपत्कालीन व्यवस्थापन विभागातील कर्मचारी कोरोनावर उपचार घेत आहेत. यामुळे या विभागाकडून चालवण्यात येणाऱ्या हेल्पलाईनवरील कॉल स्वीकारण्यासाठी खासगी कंपनीला कंत्राट दिले जाणार आहे.

mumbai
मुंबई पालिकेच्या वॉर रूमवर कोरोनाचा हल्ला

By

Published : May 30, 2020, 12:38 PM IST

मुंबई - जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूने मुंबईला हॉटस्पॉट बनवले आहे. मुंबईचे व्यवस्थापन पाहणाऱ्या महापालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागावरही कोरोनाने हल्ला केला आहे. यामुळे आपत्कालीन व्यवस्थापन विभागातील कर्मचारी कोरोनावर उपचार घेत आहेत. यामुळे या विभागाकडून चालवण्यात येणाऱ्या हेल्पलाईनवरील कॉल स्वीकारण्यासाठी खासगी कंपनीला कंत्राट दिले जाणार आहे.

मुंबईमध्ये आग लागणे, इमारत पडणे, पावसाळ्यात पाणी तुंबणे आदी सर्वच आपत्कालीन परिस्थितीचे व्यवस्थापन करण्यासाठी मुंबई महापालिकेने आपत्कालीन व्यवस्थापन विभाग निर्माण केला. मुंबईत कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढल्याने या विभागात आता कोरोनाबाबत वॉर रूम बनवण्यात आला आहे. आपत्कालीन व्यवस्थापन विभागात 48 कर्मचारी काम करत असून त्यापैकी 27 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच 10 ते 12 कर्मचारी कामावर येत नाहीत. यामुळे उर्वरित कर्मचाऱ्याना मुंबईमधून येणारे इमर्जन्सी कॉलला उत्तरे द्यावी लागत आहेत, तसेच त्याची नोंदही करावी लागत आहे.

मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्यावर पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाला वॉर रूम घोषित करण्यात आले. या विभागाच्या 1916 वर कॉल केल्यावर कोरोनाबाबत माहिती, रुग्णांना बेड उपलब्ध करून देणे, एम्ब्युलन्स उपलब्ध करून देणे अशी कामे केली जात आहेत. मात्र कर्मचारी कमी असल्याने हे काम योग्य प्रकारे होत नाही. सध्या कॉलची संख्या वाढल्याने हे काम खासगी कंत्राटदाराला दिले जाणार आहे. तसेच परेल येथे आपत्कालीन व्यवस्थापन विभागाचे दुसरे केंद्र सुरू करण्यात आले आहे. त्याठिकाणी काही कर्मचाऱ्यांना काम देऊन फिजिकल डिस्टन्सिंग ठेवले जाणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details