महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

स्थायी समिती अध्यक्षपदावर शिवसेनेच्या यशवंत जाधव यांची तिसऱ्यांदा निवड

मुंबई पालिकेतील स्थायी समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीत यशवंत जाधव यांना 14 तर भाजपचे मकरंद नार्वेकर यांना 9 मते मिळाल्याने यशवंत जाधव तिसऱ्यांदा स्थायी समिती अध्यक्ष पदावर तिसऱ्यांदा विजयी झाले आहेत.

स्थायी समिती अध्यक्षपदावर शिवसेनेच्या यशवंत जाधव यांची तिसऱ्यांदा निवड
स्थायी समिती अध्यक्षपदावर शिवसेनेच्या यशवंत जाधव यांची तिसऱ्यांदा निवड

By

Published : Oct 5, 2020, 3:09 PM IST

Updated : Oct 5, 2020, 6:18 PM IST

मुंबई - मुंबई महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्ष पदावर सत्ताधारी शिवसेनेचे यशवंत जाधव यांची तिसऱ्यांदा निवड झाली आहे. आज(सोमवार) झालेल्या निवडणुकीत काँग्रेसने तटस्थ भूमिका घेतली. तर, राष्ट्रवादी आणि समाजवादीने शिवसेनेला मतदान केल्याने जाधव हे तिसऱ्यांदा विजयी झाले आहेत. यामुळे पालिकेच्या तिजोरीच्या चाव्या पुन्हा एकदा यशवंत जाधव यांच्याकडे आल्या आहेत.

स्थायी समिती अध्यक्षपदावर शिवसेनेच्या यशवंत जाधव यांची तिसऱ्यांदा निवड

मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीत पालिकेचे सर्व आर्थिक खर्चाचे प्रस्ताव मंजूर केले जातात. या समितीत एकूण 26 सदस्य आहेत. त्यात शिवसेनेचे 12, भाजपचे 10 सदस्य आहेत. भाजपचे भालचंद्र शिरसाट हे नामनिर्देशित सदस्य असल्याने त्यांना मतदान करण्याचा अधिकार नाही. यामुळे भाजपचे 9 सदस्य मतदान करू शकतात. काँग्रेसचे 3, राष्ट्रवादीचा 1 तर समाजवादीचा 1 सदस्य आहे. आज झालेल्या निवडणुकीसाठी शिवसेनेकडून यशवंत जाधव, भाजपकडून मकरंद नार्वेकर तर काँग्रेसकडून आसिफ झकेरीया यांनी उमेदवारी अर्ज भरला होता. निवडणुकीदरम्यान काँग्रेसच्या आसिफ झकेरीया यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. तर, राष्ट्रवादी आणि समाजवादीने शिवसेनेच्या यशवंत जाधव यांना मतदान केले.

यशवंत जाधव यांना 14 तर भाजपचे मकरंद नार्वेकर यांना 9 मते मिळाल्याने यशवंत जाधव तिसऱ्यांदा स्थायी समिती अध्यक्ष पदावर तिसऱ्यांदा विजयी झाले आहेत. आम्ही भरपूर निवडणुका लढवल्या आहेत. निवडणुका कशा लढवायच्या हे आम्हाला माहित आहे. राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस या तिन्ही पक्षाचे सरकार चांगले काम करत आहे. यामुळे राष्ट्रवादी आणि समाजवादी पक्षाने आम्हाला मतदान केले आहे. राष्ट्रवादी आणि समाजवादीच्या मदतीने पहिल्यांदा शिवसेनेचा स्थायी समिती अध्यक्ष निवडून आला आहे. हा एक चांगला चमत्कार आहे, असे नवनिर्वाचित स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी म्हटले आहे.

राज्यात आमच्यासोबत असलेली काँग्रेस पालिकेत विरोधीपक्षात आहे. उच्च न्यायालयानेही भाजपने केलेला दावा फेटाळत काँग्रेकडेच विरोधी पक्षनेतेपद राहील असा निकाल दिला आहे. यामुळे काँग्रेसने तटस्थ राहण्याचा आणि शिवसेनेला मतदान करण्याचा निर्णय घेतला असावा, असे जाधव यांनी म्हटले आहे.

हेही वाचा -आदर्श! एलजीबीटी सेल सुरू करणारा राष्ट्रवादी काँग्रेस पहिलाच पक्ष

Last Updated : Oct 5, 2020, 6:18 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details