महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नागरिकांचा जीव वाचवण्यासाठी 'एनडीआरएफ'च्या धर्तीवरील 'सीडीआरएफ' - bhandoop

सुरक्षा खात्यातील रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया सुरु करणार असल्याचे त्यांनी सांगितले. अत्याधुनिक प्रकारचे सीसीटीव्ही कॅमरे, स्कॅनर मशिन, वाहनांना अडथळा ठरणारी यंत्रे विकत घेऊन आपण अत्यंत चांगल्या प्रकारे सुरक्षा दलाचे आधुनिकीकरण करण्यावर भर देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मुंबई

By

Published : Mar 1, 2019, 10:09 PM IST

मुंबई - बृहन्मुंबई महापालिकेच्या सुरक्षा दलाने राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दलाच्या (एनडीआरएफ) धर्तीवर मुंबईत घडणाऱया आपत्‍कालीन परिस्‍थि‍तीमध्‍ये नागरिकांच्‍या मदतीसाठी ‘शहर आपत्ती प्रतिसाद पथकाची’ (सीडीआरएफ) नव्‍याने स्‍थापना केली आहे. हे पथक येत्या काळात नागरिकांचा जीव वाचवण्यासाठी उपयोगी पडेल, असा आशावाद पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाचे सह-आयुक्त डॉ. किशोर क्षीरसागर यांनी केले.


बृहन्मुंबई महानगरपालिका सुरक्षा दलाचा ‘५३ वा वर्धापन दिन’ भांडुप संकुल येथील सुरक्षा दल प्रशिक्षण केंद्राच्या प्रांगणात पार पडला, त्याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी बोलताना सुरक्षा खात्यातील रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया सुरु करणार असल्याचे त्यांनी सांगितले. अत्याधुनिक प्रकारचे सीसीटीव्ही कॅमरे, स्कॅनर मशिन, वाहनांना अडथळा ठरणारी यंत्रे विकत घेऊन आपण अत्यंत चांगल्या प्रकारे सुरक्षा दलाचे आधुनिकीकरण करण्यावर भर देणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्‍यासोबतच देशपातळीवरील सध्‍याची परिस्‍थि‍ती लक्षात घेता बृहन्‍मुंबई महापालिकेच्‍या मालमत्‍ताचे रक्षण करण्‍यासाठी सुरक्षा दलाने आता अधि‍क गांर्भीयाने आपले कर्तव्‍य पार पाडावे, अशी सूचना त्‍यांनी यावेळी केली.


सुरक्षा दलाचा आढावा घेताना प्रमुख सुरक्षा अधिकारी विनोद बाडकर यांनी सुरक्षा दलात रिक्त असलेली रिक्त पदे भरण्यासाठी भरतीचा प्रस्ताव लवकरच सादर करणार असल्याचे सांगितले. त्‍याचप्रमाणे सीसीटीव्‍ही यंत्रणा बसविण्‍याचे काम लवकरच पूर्ण करण्‍यात येणार असल्‍याचे सांगितले. यावेळी कार्यक्रमास सह आयुक्त अशोक खैरे, उप आयुक्त रणजित ढाकणे तसेच एस विभागाचे सहाय्यक आयुक्‍त संतोषकुमार धोंडे आदी उपस्थित होते.

ABOUT THE AUTHOR

...view details