महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Doctor Meet CM : पालिकेच्या निवासी डॉक्टरांनी घेतली मुख्यमंत्री शिंदे यांची भेट - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

राज्यातील निवासी डॉक्टरांनी (BMC resident doctor) २ आणि ३ जानेवारीला काम बंद आंदोलन (Resident doctors strike) केले. प्रशासनाने प्रश्न सोडवण्याकडे लक्ष दिलेले नाही. यामुळे निवासी डॉक्टरांनी शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेवून मागण्यांचे निवेदन दिले. त्यांनी गिरीश महाजन यांनी याबाबत निर्णय घेण्याचे निर्देश दिले (doctor meet CM Eknath Shinde) आहेत.

Doctor Meet CM
डॉक्टरांनी घेतली मुख्यमंत्री शिंदे यांची भेट

By

Published : Jan 7, 2023, 8:09 AM IST

मुंबई :आपल्या विविध मागण्यासाठी निवासी डॉक्टरांनी मुंबईसह ( Resident Doctors Strike In Mumbai ) राज्यभरात संप पुकारला होता. राज्यातील निवासी डॉक्टरांनी (BMC resident doctor) दोन दिवस संप केला होता. यावेळी पालिका निवासी डॉक्टरांच्या मागण्यांबाबत दोन दिवसात कार्यवाही न झाल्यास मुख्यमंत्र्यांकडे बैठक घेवू, असे वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले होते. दोन दिवसात पालिकेने कोणत्याही योग्य प्रकारची कार्यवाही केली नसल्याने शुक्रवारी पालिका रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनी भेट घेतली. यावेळी गिरीश महाजन यांनी याबाबत निर्णय घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले (doctor meet CM Eknath Shinde) आहेत.

डॉक्टरांचा संप :महागाई भत्ता, सहयोगी प्राध्यापकांची रिक्त पदे भरणे, वसतीगृहाच्या समस्या, मुंबई महानगरपालिकेकडून दर महिना मिळणारा प्रलंबित कोविड भत्ता या कारणांमुळे राज्यभरातील सात हजार निवासी डॉक्टरांनी २ आणि ३ जानेवारीला काम बंद आंदोलन (Doctor Meet CM) केले. मुंबई महानगरपालिकेच्या केईएम, नायर, सायन, कूपर आदी रुग्णालयांमध्ये २ हजार डॉक्टर्स कार्यरत आहेत. या डॉक्टरांना कोविड काळातील भत्ता, डीए तसेच वसतिगृह हे प्रश्न सोडवण्यात आलेले नाहीत. यासाठी पालिका रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनीही संपात सहभाग (Resident doctors strike) घेतला.


कोविड भत्ता मंजूर :डॉक्टरांचा संप सुरु असल्याने रुग्णांना त्रास होऊ नये म्हणून वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी डॉक्टरांसोबत बैठक घेऊन संप मागे घेतल्याची घोषणा केली. यावेळी पालिकेच्या निवासी डॉक्टरांचे प्रश्न सोडवण्यासाठी पालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांचाशी, भेटावे असे मंत्री महाजन यांनी सांगितले होते. डॉक्टरांनी आयुक्तांशी भेट घेतल्यावर कोविड भत्त्याची फाईल मंजूर झाल्याचे आयुक्तांनी (BMC resident doctor meet CM) सांगितले. इतर मागण्यांबाबत अतिरिक्त आयुक्त संजीवकुमार यांची भेट घेण्यास आयुक्तांनी सांगितले होते. संजीवकुमार यांनी पालिकेच्या संचालक वैद्यकीय शिक्षण आणि आरोग्य यांना पुढील कार्यवाही करण्यास सांगितले.


मुख्यमंत्र्यांची भेट :वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांच्यासोबत झालेल्या बैठकीत दोन दिवसाची मुदत देण्यात आली होती. मात्र पालिका प्रशासनाने कोविड भत्ता वगळता कोणतेही प्रश्न सोडवण्याकडे लक्ष दिलेले नाही. यामुळे निवासी डॉक्टरांनी शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांची भेट घेवून मागण्यांचे निवेदन दिले. त्यावर मंत्री गिरीश महाजन यांनी निर्णय घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले (BMC resident doctor meet CM Eknath Shinde) आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details