मुंबई- रस्त्यावर पार्किंग करणाऱ्या वाहनांवर पालिकेकडून जप्तीची कारवाई केली जात आहे. या कारवाई अंतर्गत गेल्या सात दिवसात ५०५ वाहनचालकांवर पालिकेकडून कारवाई करण्यात आली असून, २५ लाख ७९ हजार ६३० रुपयाचा दंड वसूल करण्यात आल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
मुंबईत पार्किंगची संख्या कमी असून वाहनांची संख्या जास्त आहे. यामुळे मुंबईकर नागरिक रस्त्यावर मिळेल त्या ठिकाणी आपली वाहने पार्क करतात. यामुळे वाहतुकीची कोंडीही होते. यावर उपाय म्हणून नागरिकांना शिस्त लावण्याच्या नावाखाली पालिकेकडून पार्किंगच्या परिसरात ५०० मिटर अंतरात वाहने पार्क केली असल्यास त्यावर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. ७ जुलैपासून मुंबईत अशी कारवाई सुरु असून वाहनचालकांकडून एक ते दहा हजार रुपये दंड वसूल केले जात आहेत. पालिकेचे वाहनतळ असलेल्या अनेक परिसरात ५०० मीटरच्या आत मोठ्या संख्येने रहिवासी राहत आहेत. अशा स्थानिक रहिवाशांकडूनही गाडी पार्क केल्यास पालिकेकडून हजारो रुपयांचा दंड वसूल केला जात असल्यामुळे वादावादी आणि प्रशासन-स्थानिक यांच्यात संघर्षाचे प्रसंग घडत आहेत. काही ठिकाणी पालिकेच्या कारवाईविरोधात रास्तो रोको, आंदोलने केली जात आहेत. त्यानंतरही पालिकेची कारवाई सुरूच आहे. महापालिकेद्वारे विविध १४६ ठिकाणी तब्बल ३४ हजार ८०८ वाहने ‘पार्क करण्याची सुविधा उपलब्ध आहे. पहिल्या टप्प्यात महापालिकेच्या २३ ठिकाणी असणाऱ्या सार्वजनिक वाहनतळांलगतच्या ५०० मीटर परिसरात कारवाई केली जात आहे. पालिकेच्या वाहतूक खात्याद्वारे याबाबत जनजागृती करणारे फलकही लावण्यात आले आहेत.
२५ लाखांचा दंड वसूल -