मुंबई -मुंबईत गेल्या वर्षी मार्चपासून कोरोनाचा प्रसार सुरू झाला. ऑगस्ट महिन्यात काही प्रमाणात कोरोना आटोक्यात आला होता. मात्र, सप्टेंबर महिन्यात गणेशोत्सवादरम्यान झालेल्या गर्दीमुळे कोरोना पुन्हा वाढला होता. आता देखील १ फेब्रुवारीपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे गणेशोत्सवानंतर ज्या उपाययोजना करण्यात आल्या होत्या त्या उपाययोजनांची पुन्हा अंमलबजावणी
करण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिकेने घेतला आहे. मुंबईत मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण वाढण्याची शक्यता असल्याने रुग्णालये हाय अलर्टवर ठेवण्यात आली आहेत. एका पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील हायरिस्क १५ व्यक्तिंचा शोध घेऊन त्यांना क्वारंटाईन करण्याचे आदेश दिल्याची माहिती महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.
खबरदारी म्हणून यंत्रणा तैनात -
मुंबईत गेल्या अकरा महिन्यांच्या उपाययोजनांमुळे कोरोना आटोक्यात आला होता. मात्र, मुंबईकरांनी कोरोनाचे नियम न पाळल्याने कोरोना पुन्हा डोके वर काढू लागला आहे. मुंबईत गेल्या २० दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. जानेवारीत ३०० ते ४०० दरम्यान असलेली रुग्णसंख्या आता ९००च्या वर गेली आहे. या पार्श्वभूमीवर पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांच्या प्रमुख उपस्थितीत खासगी लॅब, पालिका दवाखाने, खासगी दवाखाने, कोरोना सेंटर्सची महत्त्वपूर्ण बैठक झाली. सप्टेंबर २०२० मध्ये मुंबईतील रुग्णसंख्या अडीच हजारांवर गेली होती. यावेळी पालिकेने केलेल्या प्रभावी उपाययोजनांमुळे कोरोना नियंत्रणात आला होता. सद्यस्थितीत सप्टेंबरसारखी स्थिती नसली तरी खबरदारी म्हणून पालिकेने सर्व यंत्रणा तैनात करण्याची कार्यवाही सुरू केल्याची माहिती काकाणी यांनी दिली. रुग्णालये, जम्बो सेंटरमधील सर्व बेड, आयसीयू, ऑक्सिजन अॅक्टिव्ह करावेत, सुरक्षा-अग्निशमन यंत्रणा, केटरिंग सर्व्हिस सज्ज ठेवण्याचा सूचना संबंधितांना देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
कारवाईचा बडगा -