मुंबई: रुग्णालयांनी औषधांचा पुरवठा, बेड, वैद्यकीय उपकरणे, वैद्यकीय ऑक्सिजन आणि मानवी संसाधन क्षमता तसेच लसीकरण कव्हरेजसह त्यांच्या तयारीचे मूल्यांकन केले जात आहे. 10 व 11 एप्रिल 2023 रोजी एक देशव्यापी मॉक ड्रिल आयोजित केली आहे. सार्वजनिक आणि खासगी रुग्णालयांच्या तयारीचे मूल्यांकन करण्यासाठी भारत सरकार आणि राज्याच्या सूचनेनुसार, पालिकेने गोळा करण्यास सुरुवात केली आहे.
इतके बेड्स उपलब्ध: १५ पालिकेची रुग्णालये, ३ सरकारी रुग्णालये आणि ३५ खाजगी रुग्णालये आहेत. ज्यामध्ये कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी तयारी ठेवण्यात आली आहे. रुग्णांवर उपचार करण्यासाठी 1995 बेड्स असून त्यापैकी 1683 सध्या उपलब्ध आहेत. ऑक्सिजन सपोर्टेड बेड 1316 असून त्यापैकी 1073 फंक्शनल आहेत. ICU बेड 711 असून त्यापैकी 666, व्हेंटिलेटर 649 असून 393 कार्यशील आहेत. रुग्णांना विलागिकरणात ठेवण्यासाठी 4022 बेड्स असून 3422 बेड्स कार्यशील आहेत.
इतके कर्मचारी सज्ज: कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी 1413 डॉक्टर असून त्यापैकी 1343 डॉक्टर कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी प्रशिक्षित आहेत. 3880 नर्स असून त्यापैकी 3244 नर्स कोरोना व्यवस्थापनात प्रशिक्षित आहेत. 1250 पॅरामेडिक्स कर्मचारी असून 1205 प्रशिक्षित आहेत. एकूण 6543 पैकी 5792 कर्मचारी प्रशिक्षित आहेत.