महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

BMC Property Tax Collection: मुंबई पालिकेची मालमत्ता कर वसुली पुन्हा सुरू; आतापर्यंत 3849 कोटी रुपये वसुली

कोरोना काळात बृहन्मुंबई महापालिकेची मंदावलेली कर वसुली आता पुन्हा एकदा सुरू झाली आहे. नव्या वर्षात बीएमसीने मालमत्ता कर वसुलीचे १०० टक्के उद्दिष्ट ठेवले आहे. परंतु, 22 जानेवारी 2023 पर्यंत एकूण मालमत्ता कर वसुलीच्या केवळ 54 टक्केच वसुली करण्यात आली आहे. बीएमसीने 2022-23 या आर्थिक वर्षात 7193 कोटी रुपयांचा मालमत्ता कर वसूल करण्याचे उद्दिष्ट ठेवले होते. त्यापैकी 3849 कोटी रुपये आतापर्यंत वसूल झाले आहेत.

By

Published : Jan 24, 2023, 6:10 PM IST

BMC Property Tax Collection
बृहन्मुंबई महापालिका

मुंबई :चालू आर्थिक वर्ष संपायला अवघे दोन महिने उरले आहेत. बीएमसीने दिलेल्या माहितीनुसार, कर वसुलीसाठी सर्वांना नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत. जानेवारीअखेर 60 टक्के कर संकलन अपेक्षित आहे. फेब्रुवारी आणि मार्चमध्ये बीएमसी मालमत्ता कर वसुलीसाठी मोहीम राबवणार आहे. आम्हाला आशा आहे की आम्ही 100 टक्के लक्ष्य गाठू शकू. कोरोनामुळे मागील दोन वर्षे कर संकलनासाठी खूप कठीण गेली. आता संकटातून सावरल्यानंतर रोजगार आणि आर्थिक उलाढाली वाढल्या आहेत. त्यामुळेच यंदा मालमत्ता कराची वसुली सरप्लस होईल, अशी आशा आहे.


लवकरच नोटिसा पाठवणार:पालिकेने दिलेल्या माहितीनुसार, 21 जानेवारीपर्यंत सर्वाधिक मालमत्ता कर संकलन पश्चिम उपनगरातून 1896 कोटी रुपये (63 टक्के) होते. दुसऱ्या क्रमांकावर मुंबई शहर आहे, जिथे आतापर्यंत मालमत्ता कर म्हणून 1,158 कोटी रुपये (65 टक्के) जमा झाले आहेत, तर पूर्व उपनगरांनी सर्वांत कमी 792 कोटी रुपये (64 टक्के) जमा केले आहेत. बीएमसीने ३१ मार्च २०२३ पर्यंत पश्चिम उपनगरातून ३३४४ कोटी रुपये, मुंबई शहरातून २३६७ कोटी रुपये आणि पूर्व उपनगरातून १४८२ कोटी रुपये मालमत्ता कर वसूल करणे अपेक्षित आहे. गेल्या वर्षी 22 जानेवारी 2022 पर्यंत बीएमसीने मुंबईकरांकडून मालमत्ता कर म्हणून 3738 कोटी रुपये वसूल केले होते. गेल्या वर्षी बीएमसीने ३१ मार्चपर्यंत ५७९२ कोटी रुपये वसूल केले होते.


मालमत्ता कर मुख्य स्रोत:बीएमसीच्या एकूण उत्पन्नात मालमत्ता कराचा वाटा २० टक्क्यांहून अधिक आहे. मालमत्ता कर थकबाकीदारांमध्ये सर्वसामान्य नागरिकांसह बिल्डर, हॉटेल मालक, संस्था, व्यावसायिक आस्थापना, औद्योगिक आस्थापना, खुल्या जागा, छोटे उद्योग, सरकारी मालकीच्या मालमत्ता, शैक्षणिक संस्था आणि मॉल्स इत्यादींचा समावेश आहे. बीएमसीचे जास्तीत जास्त उत्पन्न जकात करातून होते. परंतु, सरकारने ते रद्द केले आणि जीएसटी लागू केला, जो बीएमसीला राज्य सरकारकडून मिळतो. त्यामुळे आता बीएमसीच्या उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत मालमत्ता कर बनला आहे.


कर माफीचा फटका:५०० फुटांच्या घरांना संपूर्ण करमाफी दिल्यानंतर पालिकेची आर्थिक स्थिती अधिकच डळमळीत झाली. ५०० चौरस फुटांच्या घरांमधून मालमत्ता करासह इतर सर्व करांची वसुली न केल्यामुळे बीएमसीला सुमारे ४५० कोटी रुपये कमी मिळत आहेत. मुंबईत 500 चौरस फुटांची 15 लाख घरे आहेत.

हेही वाचा :Chandrahar Patil On Maharashtra Kesari : महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत पैलवानांवर अन्याय होतो- पैलवान चंद्रहार पाटील

ABOUT THE AUTHOR

...view details