महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

BMC Playground : पालिकेच्या चुकीमुळे खेळाच्या मैदानाचा भूखंड बिल्डरच्या घशात ; भूखंड पुन्हा ताब्यात घ्यावा - रवी राजा - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

दादर दादासाहेब फाळके रोड येथे भूखंड २ हजार चौरस फुटांचा भूखंड खेळाचे मैदान म्हणून राखीव (BMC Playground) होता. पालिकेने केलेल्या दुर्लक्षामुळे बिल्डरच्या ताब्यात (custody to builder due to disregard of carporation) गेला. भूखंड पुन्हा ताब्यात घेवून मैदान म्हणून आरक्षित करावे आणि दोषी अधिकाऱ्यांची चौकशी करावी, अशी मागणी रवी राजा यांनी केली.

Mumbai Municipal Corporation
मुंबई महानगरपालिका

By

Published : Dec 13, 2022, 2:55 PM IST

प्रतिक्रिया देताना रवी राजा, माजी विरोधी पक्ष नेते, मुंबई महापालिका

मुंबई : दादर फाळके रोड येथील मुंबई महानगरपालिकेचा एक २ हजार चौरस फुटांचा भूखंड खेळाचे मैदान म्हणून राखीव (BMC Playground) होता. पालिकेने केलेल्या दुर्लक्षामुळे बिल्डरच्या ताब्यात गेला आहे. या भूखंडाचे आरक्षण बदलले जाणार आहे. यामुळे हा भूखंड पुन्हा ताब्यात घ्यावा, अशी मागणी पालिकेतील माजी विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी केली आहे.

भूखंड बिल्डरच्या ताब्यात :दादर दादासाहेब फाळके रोड येथे भूखंड २ हजार चौरस फुटांचा भूखंड खेळाचे मैदान म्हणून राखीव (bmc playground plot custody to builder) होता. हा भूखंड पालिकेने ताब्यात घ्यावा म्हणून रहेजा बिल्डरने २०१२ - १३ मध्ये पालिकेला परचेस नोटीस दिली होती. पालिकेला १५० कोटी रुपये खर्च करून हा भूखंड ताब्यात घ्यायचा होता. त्यासाठी पालिकेने जिल्हाधिकारी यांच्या मार्फत हा भूखंड ताब्यात घेणे अपेक्षित होते. मात्र हा भूखंड पालिकेने गेल्या ८ ते १० वर्षात ताब्यात घेतलेला नाही. पालिकेने भूखंड ताब्यात घेतला नसल्याने कोर्टाने भूखंडावरील आरक्षण बदलावे असे आदेश दिले (custody to builder due to disregard of carporation) आहेत.

उच्च न्यायालयात धाव :पालीकेने (Mumbai Municipal Corporation) नोटीस देवूनही हा भूखंड ताब्यात घेतला नसल्याने बिल्डरने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. या भूखंडावरील खेळाचे मैदान म्हणून असलेले आरक्षण बदलावे, असे आदेश न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहेत. पालिकेच्या चुकीमुळे हा भूखंड बिल्डरच्या ताब्यात गेला आहे. यामुळे हा भूखंड पुन्हा ताब्यात घेवून खेळाचे मैदान म्हणून आरक्षित करावे आणि दोषी अधिकाऱ्यांची चौकशी करावी, अशी मागणी रवी राजा यांनी केली आहे. या मागणीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिणार असल्याचे रवी राजा यांनी (playground plot custody) सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details