महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

BMC news : फेब्रुवारी महिन्यात राणीच्या बागेत प्रदर्शन, लहान मुलांसाठी खास कार्टून थीम

वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानात प्रदर्शन भरवण्यात येत आहे. यात लहान मुलांसाठी खास कार्टून थीम ठेवण्यात आली आहे. त्याशिवाय 'जी २०' सदस्य देशांमधील झाडे, फुले तिथल्या भाज्या यांची माहिती देणे या माहितीपर स्तूत्य उपक्रमाचा देखील यात समावेश आहे.

mum bmc
बृहन्मुंबई महानगरपालिका

By

Published : Jan 22, 2023, 2:20 PM IST

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानात पाहुण्यांचे आगमन होणार आहे. ०३ फेब्रुवारी ते ०५ फेब्रुवारी २०२३ यादरम्यान आयोजित होणारे वार्षिक उद्यान प्रदर्शनाचे निमित्त आहे. यंदाच्या उद्यान प्रदर्शनाचे आणखी एक आकर्षण असणार आहे. म्हणजे फुलांपासून साकारलेले 'जी २०' चे बोधचिन्ह. त्याचबरोबर 'जी २०' सदस्य देशांमधील झाडे फुले आणि भाज्या यांचा समावेश देखील यंदाच्या उद्यान प्रदर्शनात असणार आहेत. अशी माहिती उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी दिली आहे. महापालिकेच्या वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान म्हणजेच राणीच्या बागेत आयोजित होणा-या उद्यान प्रदर्शनाचे उद्घाटन महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांच्या हस्ते ०३ फेब्रुवारी २०२३ रोजी सकाळी होणार आहे.


नैसर्गिक सेल्फी पॉईंट : दरवर्षी एक मध्यवर्ती संकल्पना घेऊन महापालिकेच्या उद्यान खात्याद्वारे आयोजित होणारे 'वार्षिक उद्यान प्रदर्शन' आता मुंबईची एक ओळख ठरु लागले आहे. लहान मुलांच्या भाव विश्वाचा भाग असणारे कार्टून्स या वर्षीच्या उद्यान प्रदर्शनाची मध्यवर्ती संकल्पना असणार आहे. या अंतर्गत पाना - फुलांपासून तयार केलेल्या विविध कार्टून्सच्या प्रतिकृती यंदाच्या उद्यान प्रदर्शनात बघता येणार आहेत. त्याचबरोबर पाना-फुलांपासून तयार केलेले अनेक 'सेल्फी पॉइंट' देखील यंदाच्या प्रदर्शनाचे खास आकर्षण असणार आहेत.


प्रदर्शनात दुर्मिळ वनस्पती : यासोबतच कुंड्यांमध्ये वाढविलेली फळझाडे व फुलझाडे, फळभाज्यांची झाडे, मोसमी फुलझाडे, औषधी वनस्पती, बोनसाय यांचे अक्षरशः शेकडो प्रकार मुंबईकरांना या प्रदर्शनात पहायला मिळणार आहेत. तसेच मुंबई परिसरात अत्यंत दुर्मिळ असणा-या कृष्णवडासारख्या अनेक दुर्मिळ देशी प्रजातींची झाडे देखील यंदाच्या प्रदर्शनात 'याची देही, याची डोळा' बघता येणार आहेत.


यंदा कार्टून थीम : कोविड प्रादुर्भावामुळे दोन वर्षाच्या खंडानंतर होत असलेले यंदाचे उद्यान प्रदर्शन हे अधिक संस्मरणीय व्हावे, यासाठी महापालिकेच्या उद्यान खात्यातील अधिकारी व कर्मचारी अक्षरशः दिवस-रात्र मेहनत घेत आहेत. याच मेहनतीतून पाना - फुलांपासून तयार केलेल्या विविध कार्टून्सच्या प्रतिकृतींसह विविध प्रकारच्या प्रतिकृती या प्रदर्शनास अनुभवायला मिळणार आहेत, अशी माहिती या निमित्ताने जितेंद्र परदेशी यांनी दिली आहे.


दरवर्षी हजारो मुंबईकर राणी बागेत : महापालिकेच्या उद्यान प्रदर्शनाला भेट देणा-या मुंबईकरांची संख्या देखील दरवर्षी नवनवे उच्चांक गाठत आहे. वर्ष २०१६ मध्ये सुमारे ५० हजार मुंबईकरांनी वार्षिक उद्यान प्रदर्शनाला भेट दिली होती. वर्ष २०१७ मध्ये ७५ हजारांपेक्षा अधिकांनी, तर वर्ष २०१८, तर वर्ष २०१९ आणि २०२० मध्ये तब्बल दीड लाख नागरिकांनी या प्रदर्शनाला भेट दिली होती.


या कार्टूनचा असणार समावेश :या वर्षीच्या मोहस्तवाची थीम ऐकूनच कदाचित अनेक लहानग्यांची पावले राणीच्या बागेकडे वळण्यासाठी हट्ट धरणार आहेत. या थीम नुसार असणार आहेत, मुलांची आवडती पेपा पिग फॅमिली, माशा अँड द बियर, ब्लुई, ट्वीटी आणि सिल्व्हेस्टर यांच्यासह नानाविध कार्टून्स ! विशेष म्हणजे ही सर्व कार्टून्स पानाफुलांपासून साकारली जाणार आहेत यासाठी.

हेही वाचा :Job In BMC : मुंबई महापालिकेत लघुलेखक पदासाठी भरती, 27 जागांसाठी होणार भरती

ABOUT THE AUTHOR

...view details