महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पत्रकारांवर बंदी घालणाऱ्या केईएमच्या अधिष्ठात्यांची चौकशी करा, महानगरपालिका विरोधी पक्षनेत्याची मागणी - मुंबई महानगरपालिका विरोधी पक्ष

मुंबई महानगरपालिकेच्या केईएम रुग्णालयात देशभरातून रुग्ण उपचारासाठी येतात. उत्तर प्रदेशमधून प्रिन्स राजभर या दोन महिन्यांच्या बालकाच्या हृदयात छिद्र असल्याने उपचारासाठी केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्या पलंगाजवळ असलेल्या ईसीजी मशीनमध्ये शॉक सर्किट होऊन पलंग जळाला. यात प्रिन्सचा एक हात, चेहऱ्याचा व छातीचा काही भाग भाजला.

जखमी प्रिन्स राजभर

By

Published : Nov 15, 2019, 12:03 PM IST

मुंबई -महानगरपालिकेच्या केईएम रुग्णालयात शॉक सर्किट होऊन प्रिन्स राजभर या दोन महिन्याच्या बालक भाजल्याने त्याचा एक हात कापण्यात आला आहे. सध्या राज्यभर हे प्रकरण गाजत आहे. त्यामुळे प्रिन्सच्या कुटूंबियांना भेटण्यास रुग्णालय प्रशासनाने पत्रकारांवर बंदी घातली आहे. या बंदी प्रकरणी रुग्णालयाच्या अधिष्ठात्यांची चौकशी करावी, अशी मागणी महानगरपालिकेतील विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी केली आहे.

केईएमच्या अधिष्ठात्यांची चौकशी करा - महानगरपालिका विरोधी पक्ष नेत्यांची मागणी


मुंबई महानगरपालिकेच्या केईएम रुग्णालयात देशभरातून रुग्ण उपचारासाठी येतात. उत्तर प्रदेशमधून प्रिन्स राजभर या दोन महिन्यांच्या बालकाच्या हृदयात छिद्र असल्याने उपचारासाठी केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्या पलंगाजवळ असलेल्या ईसीजी मशीनमध्ये शॉक सर्किट होऊन पलंग जळाला. यात प्रिन्सचा एक हात, चेहऱ्याचा व छातीचा काही भाग भाजला. या दुर्घटनेत प्रिन्स 20 ते 22 टक्के भाजल्याचे समजते. या प्रकरणाचे पडसाद पालिकेतील स्थायी समितीच्या बैठकीत उमटले. प्रिन्सच्या कुटुंबियांना 10 लाख रुपये नुकसान भरपाई देण्याची तसेच दोषी अधिष्ठाता आणि कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी विरोधी पक्षातर्फे करण्यात आली आहे.

हेही वाचा - जखमी प्रिन्सची जबाबदारी मुंबई महापालिकेने घ्यावी; काँग्रेसची मागणी


प्रिन्सच्या प्रकृतीबाबत माहिती घेण्यासाठी गेलेल्या पत्रकारांना रुग्णालय प्रशासनाने रोखले. अधिष्ठात्यांची लेखी परवानगी घेतल्यानंतरच प्रिन्सच्या कुटुंबियांना भेटता येईल, असे रुग्णालयाच्या सुरक्षा विभागाकडून सांगण्यात येत आहे. परवानगी घेण्यासाठी गलेल्या पत्रकारांना आरोपीप्रमाणे वागणूक दिली जात आहे.

हेही वाचा - देवेंद्र फडणवीसांच्या 'मी पुन्हा येईन'ची राऊत यांनी अशी उडवली खिल्ली


या प्रकरणाचा विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी निषेध नोंदवला आहे. पत्रकारितेला भारतात लोकशाहीचा चौथा स्तंभ मानले जाते. त्यांच्यावर निर्बंध टाकून अधिष्ठाता लोकशाहीचा अपमान करत आहेत, असे मत रवी राजा यांनी मांडले. स्थायी समितीच्या बैठकीत सर्वपक्षीय नगरसेवकांनी केईएमच्या अधिष्ठात्यांना निलंबित करण्याची मागणी केली आहे. हा मुद्दा पालिका सभागृहातही मांडणार असल्याचे राजा यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details