मुंबई -अनधिकृत बांधकाम प्रकरणी भाजप नेते मोहित कंबोज ( Bjp Leader Mohit Kamboj ) यांना पालिकेकडून नोटीस प्राप्त झाल्यानंतर आज मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी मोहित कंबोज यांच्या मुंबईतील सांताक्रूझ येथील निवासस्थानी चौकशीसाठी दाखल झाले आहेत. ( BMC Officials at Mohit Kamboj House ) महापालिकेच्या एच पश्चिम प्रभाग कार्यालया मार्फत खार येथील कंबोज यांच्या निवासस्थानाच्या तपासणीसाठी ही नोटीस पाठवली आहे. यासंदर्भात मोहित कंबोज यांनी माध्यमांशी संवाद साधला.
काय म्हणाले मोहित कंबोज?'तुम्हारे पास ED है तो हमारे पास मुंबई पोलीस' असा काहीसा खेळ सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू आहे. विरोधकांना दाबण्यासाठी एका बाजूला भाजपकडून केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर केला जातोय. तर, दुसर्या बाजूला महाराष्ट्रात देखील पोलीस व पालिका प्रशासनाचा गैरवापर होत असल्याचा आरोप सध्या महाराष्ट्रातील नेते एकमेकांवर करत आहेत. असाच काहीसा आरोप करत भाजप नेते मोहित कंबोज यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना थेट आव्हान दिलं आहे.