मुंबई - कोरोनाचा प्रसार असताना लॉकडाऊनमुळे मुंबई महापालिका अधिकाऱ्यांची मुंबईत हॉटेलमध्ये ( BMC employees stay in fiver stay hotel ) राहण्याची व्यवस्था करण्यात आली. या हॉटेलवर तब्बल ३५ कोटी रुपये खर्च करण्यात आल्याचे समोर आले आहे. पालिकेच्या आरोग्य विभागाने याबाबतचा प्रस्ताव सादर केला होता. त्याला आयुक्त तथा प्रशासकीय अधिकारी यांनी मंजुरी दिली आहे.
३५ कोटींचा खर्च -मुंबईत मार्च २०२० मध्ये कोरोना विषाणूचा पहिला रुग्ण आढळून आला. काही दिवसातच रुग्णसंख्या झपाट्याने वाढली. देशभरात लॉकडाऊन लावल्याने तसेच कोरोनाची लागण झाल्यास कुटुंबालाही लागण होण्याची भीती असल्याने कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना मुंबईत राहण्याची व्यवस्था करण्याची मागणी करण्यात आली. यानुसार आरोग्य कर्मचारी, पालिका अधिकारी, कर्मचारी यांच्यासाठी हॉटेल, पंचतरांकीत हॉटेल बुक करून त्यांची राहण्याची आणि खाण्याची व्यवस्था करण्यात आली.