महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Shiv Sena Shakha demolition Case : महापालिका अधिकाऱ्याला मारहाण प्रकरण; ठाकरे गटाच्या 4 कार्यकर्त्यांना 11 जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी - न्यायालयीन कोठडी

मुंबई येथील वांद्रे पूर्व या परिसरामध्ये उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेची 40 वर्षापासूनची जुनी शिवसेना शाखा होती. ही शाखा बेकायदेशीर आहे असल्याचे मुंबई महापालिकेने या शाखेवर कारवाई केली. ही कारवाई का केली याचा जाब विचारत ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी पालिका अधिकाऱ्याला मारहाण केली होती. याप्रकरणात सत्र न्यायालयाने ठाकरे गटाच्या 4 कार्यकर्त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

ठाकरे गटाच्या  4 कार्यकर्त्यांना न्यायालीय कोठडी
ठाकरे गटाच्या 4 कार्यकर्त्यांना न्यायालीय कोठडी

By

Published : Jun 28, 2023, 12:34 PM IST

मुंबई : ठाकरे गटाची शिवसेना शाखा कार्यालय पाडण्याची कारवाई का केली. हा जाब विचारत ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी पालिका अधिकाऱ्याला मारहाण केली होती. याप्रकरणी कार्यकर्त्यांवर मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या मारहाणी प्रकरणी सत्र न्यायालयाने ठाकरे गटाच्या 4 कार्यकर्त्यांना न्यायालयीन कोठडीची शिक्षा सुनावली आहे. दरम्यान कार्यकर्त्यांना जमीन मिळावा यासाठी ठाकरे गटाकडून तात्काळ जामीनासाठीचा अर्ज सत्र न्यायालयात दाखल करण्यात आला आहे.

न्यायालयीन कोठडी : मुंबई येथील वांद्रे पूर्व या परिसरामध्ये उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेची 40 वर्षापासूनची जुनी शिवसेना शाखा होती. ही शाखा कार्यालय बेकादेशीर असल्याचे सांगत महानगरपालिकेने ठाकरे गटाची शाखा जमीनदोस्त केली होती. शाखेवर कारवाई केल्यामुळे ठाकरे गटातील शिवसैनिक संतप्त झाले. कारवाई का केली जाब काही कार्यकर्त्यांनी पालिका अधिकाऱ्याला पालिका कार्यालयात विचारला. त्यावेळी काही कार्यकर्त्यांनी पालिका अधिकाऱ्यांला मारहाण केली. मारहाण केल्या प्रकरणी पालिका अधिकाऱ्यांनी पोलीस ठाण्यात गुन्हा देखील होता. त्यानुसार पोलिसांनी या 4 कार्यकर्त्यांना अटक केली. अटक केल्यानंतर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना मुंबई सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. अधिकाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी न्यायालयाने त्यांना 11 जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडीची शिक्षा सुनावली आहे.

का केली मारहाण :मुंबई वांद्रे येथील ठाकरे गटाची शिवसेना शाखा बेकादेशीर असल्याचे सांगत मुंबई महापालिकेने शाखा जमीनदोस्त केली होती. दरम्यान शिवसेनेची ही शाखा 40 वर्षापासून होती. या जुन्या कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज आणि बाळासाहेब ठाकरे यांची प्रतिमा होती. कारवाई करत असताना या प्रतिमांना बाहेर नेण्याची मागणी कार्यकर्त्यांनी केली होती केली. मात्र अधिकाऱ्यांनी या महापुरुषांच्या प्रतिमा काही तिथून नीटपणे न काढता त्यांची विटंबना केली; असा दावा त्यांनी केला होता. परंतु या सर्व प्रकरणांमध्ये ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी पालिका अधिकाऱ्यांना मारहाण करायला सुरुवात केली.

जामीन अर्ज : पालिका अधिकाऱ्यांकडून या चार कार्यकर्त्यांनी शासकीय कामकाजात अडथळा आणला अशा प्रकारचा गुन्हा वाकोला पोलीस ठाणे या ठिकाणी दाखल केलेला आहे. पोलिसांनी त्या 4 कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले होते. परंतु मुंबई सत्र न्यायालयामध्ये त्यांच्या संदर्भात ठाकरे गटाकडून तातडीने खटला दाखल करण्यात आला. या 4 जणांना न्यायालयीन कोठडी मिळावी, अशी मागणी करण्यात आली. त्यामुळे सत्र न्यायालय त्यांना न्यायालयीन कोठडी दिली. परंतु आता हाती आलेल्या माहितीनुसार, ता अनिल परब यांनी या चारही कार्यकर्त्यांना जामीन मिळावा यासाठी तातडीचा अर्ज केला आहे.

हेही वाचा -

  1. Thackeray Group March : ठाकरे गटाच्या मोर्चाला परवानगी, मात्र मार्गात बदल
  2. Bmc Action : मुंबई पालिकेची ठाकरे गटाच्या शाखेवर कारवाई, शाखा अनधिकृत असल्याचे कारण देत चालवला बुलडोझर

ABOUT THE AUTHOR

...view details