मुंबई - मुंबईमधील दुकानांवर मराठी पाट्या लावणे सरकार पालिकेने बंधनकारक ( Installation of Marathi boards is mandatory ) केले आहे. त्या नंतरही बहुसंख्य दुकानदारांनी मराठी पाट्या लावल्या नसल्याने सोमवार १० ऑक्टोबरपासून ( ) पालिकेने तपासणी सुरु केली ( Inspection of municipality for not installing Marathi boards ) आहे. १८ ऑक्टोबरपर्यंत १३९४२ ठिकाणी केलेल्या तपासणीत ३ हजार ३४ दुकानदारांनी मराठी पाट्या लावण्याकडे दुर्लक्ष केल्याचे आढळले असून संबंधितांना नोटिस देण्यात आली ( Municipality notice to shopkeepers ) आहे. पुढील सात दिवसांत अंमलबजावणी न केल्यास नियमानुसार कारवाईचा ( Action will be taken if Marathi plates are not installed ) बडगा उगारला जाणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली.
BMC Notice to Shopkeepers : मुंबईत दुकानांवर मराठी पाट्या लावणे बंधनकारक.. दुकानदारांना नोटिसा - मराठी पाट्या न लावल्यास कारवाई
कानांवर मराठी पाट्या न लावणे दुकांनदारांना महागात पडणार आहे. मुंबईमधील दुकानांवर मराठी पाट्या लावणे सरकार पालिकेने बंधनकारक ( Installation of Marathi boards is mandatory ) केले आहे. दुकांदारांनी पुढील सात दिवसांत अंमलबजावणी न केल्यास नियमानुसार कारवाईचा ( Action will be taken if Marathi plates are not installed ) बडगा उगारला जाणार आहे.
दुकानांवर मराठी पाट्यांसाठी ३ वेळा मुदतवाढ -मुंबईत सुमारे ५ लाख दुकाने आहेत. मराठी पाट्या लावण्यासाठी पालिकेने ३१ मे, ३० जून व ३० सप्टेंबर अशी तीन वेळा डेडलाईन दिली होती. त्यानंतर १० ऑक्टोबरपासून तपासणी आणि कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे. १८ ऑक्टोबर पर्यंत पालिकेने एकूण १३९४२ दुकानांना भेटी दिल्या. त्यापैकी १०९०८ दुकानांवर मराठी पाट्या लावण्यात आल्याचे निदर्शनास आले. तर ३०३४ दुकानांवर मराठी पाट्या नसल्याचे निदर्शनास आले. या दुकानांना नोटीस देण्यात आल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
काय आहे नियम -२०१८ च्या निर्णयानुसार दहा किंवा दहापेक्षा जास्त कामगार असणाऱ्या दुकानांवर मराठी पाट्या बंधनकारक होते. मात्र, नव्या नियमानुसार कर्मचार्यांची संख्या विचारात न घेता मराठी भाषेतच फलक असणे बंधनकारक केले आहे. महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवाशर्तीचे विनियमन) सुधारणा अधिनियम २०२२ तील कलम ३६ ‘क’ (१)च्या कलम ६ अन्वये नोंदणी केलेल्या प्रत्येक दुकान-आस्थापनास कलम ७ नुसार मराठी भाषेतून नामफलक लावणे बंधनकारक आहे. मात्र, यापूर्वी तीन वेळा मुदत वाढ देऊनही अनेक दुकानांनी त्याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे पालिकेचे पथक मुंबईभर दुकानांची तपासणी करून नियमानुसार कारवाई करत आहे. त्यासाठी पालिकेच्या दुकाने, आस्थापना विभागाच्या ७५ अधिकारी-कर्मचाऱ्यांची टीम तयार केली आहे. मुंबई पालिकेच्या सर्व २४ विभागात होणार्या कारवाईत दुकानांवर मराठी पाटी नसल्यास नोटीस देवून दंडात्मक कारवाई केली जाईल असे अधिकाऱ्यांनी सांगितले.