मुंबई -राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यांच्या प्रवेशामुळे मुंबई महापालिकेतील राष्ट्रवादीचे नगरसेवकही शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु होती. मात्र, आम्ही सर्व नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेससोबत असल्याची माहिती मुंबई महापालिकेच्या गटनेत्या राखी जाधव यांनी स्पष्ट केले.
घड्याळ चिन्हावर निवडून आलो, राष्ट्रवादीसोबतच राहणार - गटनेत्या मुंबई महापालिका - sachin ahir shivsena
सचिन अहिर यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नगरसेवकही शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु होती. सचिन अहिर यांच्या नेतृत्वाखाली नऊ नगरसेवक निवडून आले होते त्यांनी आपली भूमीका स्पष्ट केली. "आम्ही पक्ष सोडणार अशा अफवा पसरल्या आहेत. आजही सर्व नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आहोत, पक्षाचे काम आम्ही करत राहू." पक्षाच्या शिस्तीप्रमाणे जो कोणी मुंबई अध्यक्ष नेमला जाईल त्यांच्या निर्देशानुसार काम करणार असल्याचे राखी जाधव यांनी सांगितले.
२०१७ मध्ये मुंबई महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सचिन अहिर यांच्या नेतृत्वाखाली नऊ नगरसेवक निवडून आले होते. या निवडणुकीत शिवसेनेचे आणि भाजपचे समान नगरसेवक निवडून आल्याने महापौर पदाला धोका नको, म्हणून मनसेचे ६ नगरसेवक शिवसेनेने फोडले. याचवेळी भाजपकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक फोडून आपल्या पक्षात सामावून घेण्याचा प्रयत्न भाजपकडून करण्यात आला. मात्र, राष्ट्रवादीचे सर्व नगरसेवक पक्षाशी एकनिष्ठ राहिले होते. यामुळे शिवसेनेच्या महापौरांची खुर्ची शाबूत राहिली होती.
मात्र, ज्यांच्या नेतृत्वात मुंबई महापालिकेचे नगरसेवक निवडून आले. त्याच नेत्याने पक्षाला सोडचिट्टी दिल्याने राष्ट्रवादीचे सर्व नगरसेवक पक्षाला सोडचिट्टी देतील अशी चर्चा सुरू झाली होती. याबाबत राष्ट्रवादीच्या गटनेत्या राखी जाधव याच्याशी संपर्क साधला असता त्या म्हणाल्या, "आम्ही पक्ष सोडणार अशा अफवा पसरल्या आहेत. आजही सर्व नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आहोत, पक्षाचे काम आम्ही करत राहू." पक्षाच्या शिस्तीप्रमाणे जो कोणी मुंबई अध्यक्ष नेमला जाईल त्यांच्या निर्देशानुसार काम करणार असल्याचे राखी जाधव यांनी सांगितले.