मुंबई :जगभरात पुन्हा एकदा कोरोना विषाणूचा प्रसार वाढला आहे. बीएफ ७ व १२० पटीने पसरणाऱ्या एक्सबीबी १.५ व्हेरिएंटचा धोका असल्याने मुंबई महापालिका सतर्क झाली (Mumbai Corona Update) आहे. विमानतळ किंवा मुंबईत एखादा रुग्ण पॉझिटीव्ह आढळून आल्यास त्याच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची (क्लोज काॅटेक्ट ट्रेनिंग) शोध मोहिम सुरु केली आहे. बाधित रुग्णांना होम क्वारंटाइन करण्यात येत आहे, पालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी दिली. चीनसह काही देशात पुन्हा एकदा कोरोना विषाणूचा प्रसार सुरू झाला आहे. कोरोनाचा नवा व्हेरियंट असलेल्या बीएफ ७ चे गुजरात व ओडिसात रुग्ण आढळून आले आहेत. तसेच गुजरातमध्ये एक्सबीबी १.५ व्हेरिएंटचाही रुग्ण आढळला आहे. या पार्श्वभूमीवर देशभरात हाय अलर्ट घोषित करण्यात आला आहे. बाहेरील देशातून येणाऱ्या प्रवाशांची आरटीपीसीआर चाचणी केली जात आहे. त्यामधून पॉझिटीव्ह आढळून येणाऱ्या प्रवाशांना क्वारंटाइन केले जात (BMC High alert Rise on Corona virus patients) आहे.
रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची शोध :मुंबई विमानतळावर आढळलेल्या तीन कोरोना बाधित प्रवाशांच्या स्वॅब पुण्याच्या प्रयोगशाळेत पाठवले असून पुढील दोन ते तीन दिवसांत अहवाल प्राप्त होणार (covid positive patients Mumbai) आहे. दरम्यान विमानतळावर आढळून आलेल्या तसेच मुंबईत रोज करण्यात येणाऱ्या चाचण्यांच्या माध्यमातून पॉझिटीव्ह आढळून आलेल्या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची शोध मोहिम महापालिकेने सुरु केली आहे. पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेल्या लोकांच्या माध्यमातून कोरोना पसरू नये, यासाठी ही मोहीम सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती डॉ. मंगला गोमारे यांनी (Rise on Corona virus patients) दिली.