मुंबई - अभिनेत्री कंगना रणौत हिचे बेकायदेशीर बांधकाम तोडल्यानंतर त्याला लागून असलेल्या फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा यांनाही मुंबई महानगरपालिकेची नोटीस दिली आहे. मात्र, त्यांना दिलेली नोटीस ही सात दिवसांची आहे. कंगनाला फक्त एकाच दिवसाची मुदत दिली होती. त्यानंतर तिचे बांधकाम तोडण्यात आले. जर मल्होत्राने पालिकेला प्रतिसाद दिला नाही तर पालिका त्याचे बांधकाम तोडणार का? याकडे सर्वांचे आता लक्ष लागले आहे.
कंगनाच्या ऑफिस शेजारील बांधकाम असलेल्या फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रालाही पालिकेची नोटीस - मनीष मल्होत्रा बेकायदेशीर बांधकाम
कंगनाला 24 तासांची नोटीस देऊन बुधवारी महानगरपालिकेने कार्यालयावर कारवाई केली. त्यानंतर त्या परिसरातील बेकायदेशीर बांधकामांवर बीएमसी कारवाई करणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. आता कंगनाच्या कार्यालयाला लागून असलेल्या फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा यांच्या बांधकामालाही सात दिवसात उत्तर देण्याची नोटीस पालिकेने बजावली आहे.
कंगना रणौतचे पाली हिल येथील 'मणिकर्णिका प्रॉडक्शन हाऊस' या कार्यालयात बेकायदेशीर बांधकाम केल्याचे कारण देत पालिकेने मंगळवारी तिला नोटीस दिली होती. कंगनाला 24 तासांची नोटीस देऊन बुधवारी महानगरपालिकेने कार्यालयावर कारवाई केली. त्यानंतर त्या परिसरातील बेकायदेशीर बांधकामांवर बीएमसी कारवाई करणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. आता कंगनाच्या कार्यालयाला लागून असलेल्या फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा यांच्या बांधकामालाही सात दिवसात उत्तर देण्याची नोटीस पालिकेने बजावली आहे.
फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा यांच्या कार्यालयालाही 7 सप्टेंबरला नोटीस देण्यात आली आहे. त्यांनी बेकायदेशीर बांधकाम केल्याचे यात म्हटले आहे. हे बांधकाम करताना त्यांनी संबंधित यंत्रणांची परवानगी घेतलेली नाही. ही नोटीस पालिकेच्या 342 आणि 345 कलामांनुसार देण्यात आली आहे. मल्होत्रा यांनी समाधानकारक उत्तर दिले नाही तर हे बेकायदेशीर बांधकाम तोडले जाईल, असे नोटीसमध्ये म्हटले आहे.