मुंबई- लोकसभा निवडणुकीच्या तारखा रविवारी घोषित करण्यात आल्या आहेत. निवडणुकीचे कामकाज सुरळीत पार पाडण्यासाठी मुंबई महापालिकेचे ११ हजार कर्मचारी पाठवण्यात आले आहेत. या कारणाने पालिकेच्या कामकाजावर याचा परिणाम होणार आहे. मात्र, उर्वरित कर्मचाऱ्यांमध्ये मुंबईकर नागरिकांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ देणार नाही, असा दावा प्रशासनाकडून करण्यात आला आहे.
मुंबई महापालिकेचे ११ हजार कर्मचारी निवडणुकीच्या कामाला - लोकसभा निवडणूक
आपल्या देशात लोकशाही आहे. लोकशाही टिकवण्यासाठी निवडणूक प्रक्रिया आवश्यक आहे. निवडणुका सुरळीत पार पाडता याव्यात, म्हणून आम्ही आमचे ११ हजार कर्मचारी पाठवले आहेत. नागरिकांची कोणतीही गैरसोय होणार नाही, याची काळजी प्रशासनाकडून घेतली जाईल, असा विश्वासही पालिका प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला आहे.
![मुंबई महापालिकेचे ११ हजार कर्मचारी निवडणुकीच्या कामाला](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/images/768-512-2685230-368-1472e222-4e5d-40ca-9865-1871ba45f45f.jpg)
केंद्रीय निवडणूक आयोगाने रविवारी मतदानाच्या तारखा जाहीर केल्या. मुंबईत ६ मतदार संघासाठी २९ एप्रिलला निवडणुका होणार आहेत. त्यासाठी मोठ्या प्रमाणात कर्मचारी वर्ग लागणार आहे. निवडणूक आयोगाकडून आलेल्या आदेशांचे पालन करणे पालिकेला बंधनकारक असते. हे आदेश पाळले नाही तर संबंधित अधिकार्यांवर गुन्हा नोंद होणे, अटक होणे, अशी कारवाई होऊ शकते. यामुळे निवडणूक कामासाठी लागणाऱ्या ९० हजार कर्मचाऱ्यांपैकी ११ हजार कर्मचारी पालिकेकडून मागवण्यात आले आहेत. आयोगाच्या मागणीनुसार हे कर्मचारी निवडणूक कामासाठी पाठवण्यात आले आहेत.