मुंबई -जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूचे मुंबईत एक लाखापेक्षा जास्त रूग्ण आहेत. मुंबईकरांना आरोग्य, स्वच्छता, पाणी आदी सुविधा पुरवताना महानगरपालिकेच्या २ हजार ६८६ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली असून १०६ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. त्यानंतरही न डगमगता कर्मचाऱ्यांनी पालिकेच्या कोणत्याही कामावर परिणाम होऊ दिला नाही. कोरोना आपल्या सोबत असल्याचे गृहीत धरूनच पालिकेचे कर्मचारी अधिकारी काम करत आहेत, अशी माहिती महानगरपालिका कामगार संघटनाच्या प्रतिनिधींनी दिली.
मुंबईत ११ मार्चला कोरोनाचा पहिला रूग्ण आढळला होता. त्यानंतर चारच महिन्यात कोरोनाने एक लाख रुग्णांचा टप्पा ओलांडला आहे. या दरम्यान रुग्णांवर उपचार करणे, शहरात स्वच्छता ठेवणे, नागरिकांना वेळेवर पाणी पुरवठा करणे, हातावर पोट असलेल्या व रस्त्या लगत फुटपाथवर राहणाऱ्या नागरिकांना अन्ना-पाण्याची पाकीटे पोहचवण्याचे काम पालिकेच्या कर्मचारी-अधिकाऱ्यांकडून केले जात आहे. या कामादरम्यान तसेच कामावर येता-जाताना पालिकेच्या २ हजार ६८६ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली असून १०६ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये आरोग्य आणि सफाई कामगारांची संख्या अधिक असल्याची माहिती कामगार संघटनांनी दिली.
कामगारांच्या सुविधांकडे दुर्लक्ष -
कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यावर महानगरपालिका आयुक्तांनी परिपत्रक काढून साथरोग प्रतिबंधक कायदा लागू करत १०० टक्के उपस्थिती सक्तीची केली आहे. यामुळे कोरोनाचा आणखी प्रसार होऊ शकतो. यावर उपाय म्हणून १५ ते ५० टक्के उपस्थिती रोटेशन पद्धतीने असावी. कर्मचाऱ्यांना ट्रेन आणि बस १० मिनिटाच्या अंतराने उपलब्ध करून द्याव्यात. मध्य, हार्बर, ट्रान्स हार्बरवरील ट्रेन सर्व स्थानकावर थांबवाव्यात. अनेक कर्मचारी लॉकडाऊनमुळे व परिसर कंटेन्मेंट झोन झाल्याने कामावर पोहचू शकले नाहीत. त्यांना विशेष कोविड रजा मंजूर करावी, अशी मागणी दी म्युनिसिपल युनियनचे सरचिटणीस रमाकांत बने यांनी केली आहे.
आरोग्य कर्मचाऱ्यांना बायोमेट्रिक हजेरी सक्तीची का?