मुंबई :विरोधी पक्ष नेते अजित पवार हे आपल्या सहकारी आमदारांसोबत भाजपात जाणार असल्याचे चर्चांना पूर्णविराम मिळाल्यानंतर काहीसं राज्यातील राजकीय वातावरण थंड झालं आहे. मात्र, दोन दिवसात राज्यात अनेक तर्कविर्तकांचा फुटलेल्या पेवांमुळे पक्षाचा कार्यकर्ता मात्र बुचकळ्यात पडला होता. उद्या राष्ट्रवादी पक्षाच्या वतीनं विभागीय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे .
शरद पवार करणार मार्गदर्शन :गेल्या दोन दिवसात अजित पवार यांच्या चर्चामुळे निर्माण झालेल्या गोंधळावर शरद पवार काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष आहे. मुंबईतील घाटकोपर महत्वपूर्ण बैठक राष्ट्रवादी काँग्रेसची ही मुंबईतील घाटकोपर येथे आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला मार्गदर्शन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार करणार आहे.
ध्येय मुंबई विकासाचे :राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थित व मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली हा मेळावा होणार आहे. शुक्रवारी सकाळी नऊ वाजल्यापासून ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने ध्येय राष्ट्रवादीचे, मुंबई विकासाचे या शीर्षाखाली कार्यकर्ता मार्गदर्शन शिबिर होणार असल्याची माहीती प्रवक्ते महेश तपासे यांनी दिली. जयंत पाटील यांच्या हस्ते द्वीप प्रज्वलन करून होणार आहे. त्याचबरोबर खासदार प्रफुल पटेल, खासदार सुप्रिया सुळे, खासदार सुनील तटकरे, माजी मंत्री छगन भुजबळ, जितेंद्र आव्हाड, अतिथी तटकरे ,अनिल देशमुख तसेच राजकीय वक्ते देखील मार्गदर्शन करणार आहे. शिबिरासाठी मुंबई विभागातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 2 हजार पेक्षा जास्त प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहे