मुंबई -महानगरपालिकेने लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर सुलभ शौचालयाची सेवा मोफत केली आहे. कोरोनामूळे देशात लॉकडाऊन झाल्यावर आर्थिक राजधानी मुंबईत अडकलेल्या देशातील वेगवेगळ्या भागात राहणाऱ्या कामगारांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे, त्यांना महापालिकेच्या या निर्णयामुळे दिलासा मिळाला आहे.
लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या नागरिकांना दिलासा.. आता मुंबईत सुलभ शौचालय सेवा मोफत - लॉकडाऊन
लॉकडाऊन लागू करण्यात आल्यामुळे अनेक नागरिक मुंबईत अडकले आहेत. मुंबईमध्ये अडकलेल्या नागरिकांसाठी महापालिकेने शहरातील सुलभ शौचालये व स्वच्छतागृहांची सेवा मोफत केली आहे. यामुळे लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
मुंबईत सुलभ शौचालय सेवा मोफत
मुंबईत महानगरपालिकेची 800 हून अधिक सुलभ शौचालये आहेत, मात्र या सेवेसाठी शुल्क आकारले जात होते. आंघोळीसाठी 10 रुपये व शौचालय वापरण्यासाठी 5 रुपये दर होता. मात्र आता ही सेवा महापालिकेने मोफत केली आहे.