महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुंबई महापालिकेची डीप क्लिनिंग मोहीम योग्य दिशेनं; 1200 मेट्रीक टन कचरा जमा - डीप क्लिनिंग मोहीम

BMC Deep Clean Drive : मुंबईतील रस्त्यावर धूळ झाल्यानं पर्यावरणाचा प्रश्न ऐरणीवर आला होता. त्यामुळं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रस्ते आणि स्वच्छता करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार महापालिकेनं मुंबईत स्वच्छता मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेला मोठं यश मिळत आहे.

BMC Deep Clean Drive
डीप क्लिनिंग मोहीम

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 17, 2023, 3:59 PM IST

मुंबई BMC Deep Clean Drive :स्वच्छ सुंदर मुंबईसाठी महापालिकेनं कंबर कसली असून विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून मुंबई महापालिकेनं डीप क्लिनिंग ड्राईव्ह हाती घेतली आहे. या स्वच्छता मोहिमेचा असर दिसून आला असून मागील पंधरा दिवसात 1200 मेट्रिक टन कचरा, डेब्रिज संकलन करण्यात आलं आहे. विशेष म्हणजे दैनंदिन कचरा जमा करण्याबरोबरच इतरही कचरा जमा करुन मुंबई स्वच्छ करण्यात मुंबई महापालिकेनं एक पाऊल पुढं टाकलं आहे. विरोधकांनी कितीही आरोप केले तरी सुद्धा या सफाई मोहिमेतून मुंबई महापालिकेनं मुंबई स्वच्छ आणि सुंदर करण्याच्या निर्धारानं टाकलेलं पाऊल यशस्वी होताना दिसत आहे.

डीप क्लिनिंग मोहीम

मुंबईत 1200 मेट्रिक टन कचरा, डेब्रिज :मागील महिन्यात मुंबईतील प्रदूषण आणि हवेचा स्तर मोठ्या प्रमाणात खालावल्याचं निदर्शनास आलं होतं त्यानंतर मुंबई महापालिका आणि विशेषतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून मुंबईत डीप क्लिनिंग मोहीम हाती घेण्यात आली. या मोहिमेमुळं या महिन्यात 1 ते 15 डिसेंबर या कालावधीत 1 हजार 200 मेट्रिक टन कचरा, डेब्रिज संकलन करण्यात आलं आहे. या स्वच्छतेमुळे मुंबईतील प्रत्येक कानाकोपऱ्यात, लहान - मोठ्या गल्लीबोलातील कचरा, डेब्रिज उचलण्याबरोबर स्वच्छता करण्यात येत असल्यानं मुंबईकर सुद्धा सुखावले आहेत. यासाठी एकंदरीत 367 सयंत्रांचाही वापर करण्यात आला आहे.

टप्प्या टप्प्यानं संपूर्ण मुंबई नगरी स्वच्छ :विशेष म्हणजे या मोहिमेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः लक्ष घालून आहेत. मुंबई महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल तसेच महापालिका अधिकारी यांना सोबत घेऊन भल्या पहाटे मुख्यमंत्री मुंबईतील रस्त्यांवर, चौपाटीवर स्वच्छता मोहीम राबवताना दिसत आहेत. मोहिमेसाठी विविध यंत्रणा खरेदी करण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणं प्रत्येक शनिवारी प्रत्येक परिमंडळात एक याप्रमाणं मुंबईतील सात परिमंडळातील सात वॉर्डमध्ये ही स्वच्छता मोहीम राबवली जात आहे. यासाठी त्या वॉर्डातील सर्व मनुष्यबळ, यंत्रणा त्या विशिष्ट वॉर्डामध्ये मोठ्या प्रमाणात स्वच्छता करण्यात येत आहे. हवेतील धुळीचं साम्राज्य कमी करण्यासाठी रस्ते पाण्यानं स्वच्छ धुतले जात आहेत. त्याचबरोबर लहानसहान रस्ते, गल्लीबोळातील गटारं, नाल्यांचे प्रवाह तसेच नाल्यांच्या आजूबाजूचा परिसर, सार्वजनिक प्रसाधनगृहे, मैदान परिसर स्वच्छ केला जात आहे. फक्त साफसफाईच नाही, तर अनधिकृत होर्डिंग, भिंती पत्रकं, रस्त्याच्या बाजूला असलेली बेवारस वाहनं सुद्धा हटवली जात आहेत. मुंबईतील अनेक ठिकाणी भिंती स्वच्छ करून त्यावर जनजागृती पर कलात्मक संदेशही रेखाटण्यात येत आहेत. त्याचप्रमाणं टप्प्या टप्प्यानं संपूर्ण मुंबई नगरी स्वच्छ करण्याचा संकल्प मुंबई महानगरपालिकेनं घेतला असून मुख्यमंत्र्यांच्या सहभागामुळं यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये यश येताना दिसून येत आहे.

हेही वाचा :

  1. मुंबईकरांनो सुट्टीनिमित्त घराबाहेर पडताय; कोणत्या मार्गांवर असेल मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
  2. काही लोकं दुसरी साफसफाई करत होते', मुख्यमंत्र्यांचं नाव नं घेता उद्धव ठाकरेंना टोला

ABOUT THE AUTHOR

...view details