मुंबई - कोरोना विषाणूचा रुग्ण आढळून आला की त्याच्या निकटवर्तीयांची त्वरित चाचणी केली जायची. मात्र, कोरोनाबाधित रुग्णाच्या निकटवर्तीयांची चाचणी ७ दिवसापर्यंत निगेटिव्ह येत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे ज्यांची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे, त्यांच्या संपर्कातील 'हाय रिस्क' गटातील व्यक्तींची कोरोना चाचणी ही किमान ७ दिवसांच्या विलगीकरणानंतर करण्याचा निर्णय बृहन्मुंबई महानगरपालिकेने घेतला आहे.
'कोरोना'ची लक्षणे नसणाऱ्यांची ७ दिवसांच्या विलगीकरणानंतर चाचणी, पालिकेचा निर्णय - मुंबई कोरोना अपडेट
'कोविड १९' आजाराची लागण झालेल्या अनेक बाधित व्यक्तींमध्ये आजाराची प्राथमिक लक्षणे दिसत नाहीत. त्यानुसार ज्या व्यक्तींची चाचणी पॉझिटिव्ह' आली आहे, अशा रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचे तत्काळ विलगीकरण करण्याचा निर्णय यापूर्वीच पालिकेने घेतला आहे. अशा गटातील व्यक्तींची कोरोना चाचणी यापूर्वी विलगीकरणानंतर लगेचच करण्यात येत होती. मात्र, आता या पद्धतीत सुधारणा करण्यात आली आहे.
'कोविड १९' आजाराची लागण झालेल्या अनेक बाधित व्यक्तींमध्ये आजाराची प्राथमिक लक्षणे दिसत नाहीत. त्यानुसार ज्या व्यक्तींची चाचणी पॉझिटिव्ह' आली आहे, अशा रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचे तत्काळ विलगीकरण करण्याचा निर्णय यापूर्वीच पालिकेने घेतला आहे. अशा गटातील व्यक्तींची कोरोना चाचणी यापूर्वी विलगीकरणानंतर लगेचच करण्यात येत होती. मात्र, आता या पद्धतीत सुधारणा करण्यात आली आहे. या गटातील व्यक्तींची विलगीकरणातील ७ दिवसानंतर चाचणी करण्याचा निर्णय आता घेण्यात आल्याची माहिती पालिकेकडून देण्यात आली आहे.
कोरोना प्रतिबंधासाठी महानगरपालिका सातत्याने प्रयत्न करीत आहे. याच प्रयत्नांचा भाग म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वैद्यकीय चाचण्या करण्यात येत आहेत. १३ एप्रिलपर्यंत मुंबईत तब्बल २७ हजार ३९७ चाचण्या करण्यात आल्या आहेत. याच तारखेपर्यंत देशात एकूण २ लाख १७ हजार ५५४ एवढ्या चाचण्या झाल्या आहेत. देशातील एकूण चाचण्यांच्या १२.५९ टक्के एवढ्या वैद्यकीय चाचण्या या केवळ बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर १३ एप्रिल २०२० पर्यंतच्या आकडेवारीनुसार मुंबईच्या खालोखाल केरळमध्ये १५ हजार ६८३, तामिळनाडूमध्ये १२ हजार ७४६, दिल्ली परिसरात ११ हजार ७०९ आणि देशातील इतर सर्व राज्यांमध्ये मिळून १ लाख ५० हजार १९ एवढ्या चाचण्या झाल्या आहेत, अशी माहिती पालिकेकडून देण्यात आली आहे.