महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

भांडूपमधील डोंगराळ भाग सौरदिव्यांनी उजळणार; पालिकेचा निर्यण - भांडूपमधील डोंगराळ भाग सौरदिव्यांनी उजळणार

पालिकेच्या भांडूप ‘एस’ विभागातील प्रभाग क्रमांक ११४ मधील डोंगराळ भागात विद्युत दिवे बसवण्यासाठी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी यांना कळवण्यात आले होते. मात्र, कार्यकारी अभियंत्यांनी या विभागातील अरुंद रस्ते आणि दाटीवाटीच्या वस्तीमुळे विद्युत दिवे बसवण्यास असमर्थता दर्शविली होती. त्यामुळे पालिकेने सौरदिवे बसवण्याचा निर्यण घेतला आहे.

मुंबई महापालिका

By

Published : Sep 24, 2019, 5:26 PM IST

मुंबई- डोंगराळ भागात अरुंद रस्ते आणि दाटीवाटीच्या वस्तीमुळे विद्युत दिव लावणे शक्य होत नाही. त्यामुळे या भागात सौरदिवे लावण्याचा निर्यण पालिकेने घेतला आहे. त्यासाठीचा प्रस्ताव पालिकेच्या स्थायी समितीमध्ये मंजुरीसाठी सादर करण्यात आला आहे. प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर भांडूपच्या डोंगराळ भागातील विजेची समस्या दूर होणार आहे.

हे वाचलं का? - पालिकेतील अधिकाऱ्यांवर आयुक्तांना भरोसा नाय का?

पालिकेच्या भांडूप ‘एस’ विभागातील प्रभाग क्रमांक ११४ मधील डोंगराळ भागात विद्युत दिवे बसवण्यासाठी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी, भांडूप विभाग यांना कळवण्यात आले होते. मात्र, कार्यकारी अभियंता, भांडूप यांनी या विभागातील अरुंद रस्ते आणि दाटीवाटीच्या वस्तीमुळे विद्युत दिवे बसवण्यास असमर्थता दर्शविली होती. याच पार्श्वभूमीवर २३२ ठिकाणी सौर उर्जेचे दिवे बसवण्याबाबत प्रभाग ११४ कडून ‘एस’ विभाग सहाय्यक आयुक्तांना यादी दिली होती. सध्या उपलब्ध असलेल्या निधीनुसार रस्त्यांवर १९१ दिवे लावण्यात येणार आहेत. या कामासाठी ओमेक्स कंट्रोल सिस्टम कंपनीला कंत्राट देण्यात आले आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणात डोंगराळ भागात नागमोडी वळणे आहेत. या चार-चार फुटांच्या रस्त्यांसाठी महावितरणच्या नियमानुसार विद्युत पोल मिळत नाहीत. त्यामुळे या ठिकाणच्या रस्त्यांसाठी पालिकेच्या माध्यमातून सौर उर्जेच्या दिव्यांचा पुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला. याबाबतचा प्रस्ताव येत्या स्थायी समितीत मंजुरीसाठी येणार आहे.

हे वाचलं का? - निवडणुकीच्या फंडासाठी स्थायी समितीत ३ हजार कोटींच्या प्रस्तावांना मंजुरी

ABOUT THE AUTHOR

...view details