महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Sep 27, 2019, 5:46 PM IST

ETV Bharat / state

युती व आघाडीत मोठा पेच; मुंबईतील हे नगरसेवक आहेत विधानसभेसाठी इच्छुक

विधानसभा निवडणूक आयागाने आचारसंहिता लागू केल्यानंतर विधानसभेसाठी इच्छूक उमेदवारांची रांग लागलेली पहायला मिळत आहे. मुंबईतल्या ३६ जागांवर युती आणि आघाडीत बिघाड होण्याची शक्यता आहे.

मुंबईतील हे नगरसेवक आहेत विधानसभेसाठी इच्छुक

मुंबई - नगरसेवक, आमदार, खासदार होणे ही प्रत्येक राजकीय पक्षातील कार्यकर्त्यांची इच्छा असते. ही इच्छा प्रत्येकाची पूर्ण होतेच असे नाही. तरीही पक्षाकडे उमेदवारी मागणी करणाऱ्यांची संख्या काही कमी नसते. मुंबईमधील ३६ विधानसभा मतदारसंघामधून सुमारे १५ नगरसेवकांनी आपण इच्छुक असल्याचे आपल्या पक्षाला कळवले आहे. यामध्ये महापौर, विरोधी पक्ष नेत्यांसह इतर नगरसेवकांचा समावेश आहे. मात्र, यामुळे युती आणि आघाडीत मोठा पेच निर्माण होण्याची शक्यता आहे.

रवी राजा विरोधी पक्ष नेते मुंबई पालिका

हेही वाचा - आम्ही पवार साहेबांसोबत जाणारच..! राष्ट्रवादीचे नेते शरद पवारांच्या निवासस्थानी दाखल

मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी वांद्रे पूर्व मतदारसंघातून शिवसेनेकडून उमेदवारी मागितली आहे. आपल्याच पक्षाच्या विद्यमान आमदार तृप्ती सावंत यांचा पत्ता कापून महाडेश्वर यांनी आपल्याला उमेदवारी द्यावी अशी मागणी केली आहे. विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी काँग्रेसकडून सायन कोळीवाडा मतदारसंघातून उमेदवारी मागितली आहे. आपण पाच वेळा या मतदारसंघामधील विविध विभागातून निवडणूक जिंकलो आहोत. या ठिकाणचे भाजपचे स्थानिक आमदार तामिळ सेलव्हन यांच्या विरोधात लाट असल्याने आपण त्यांना हरवू शकतो असे रवी राजा यांनी म्हटले आहे. पक्षाने उमेदवारी दिल्यास निवडणूक लढवू अन्यथा पालिकेत काँग्रेसचे काम करत राहू असेही रवी राजा यांनी सांगितले.

हेही वाचा - आम्ही कायदा व सुव्यवस्था मानणारी लोक, ही दडपशाही योग्य नाही - नवाब मलिक

भायखळा मतदार संघातून महापालिकेतील समाजवादी पक्षाचे गटनेते रईस शेख समाजवादी पक्षाकडून निवडणूक लढवत आहेत. मालाड पश्चिम मतदार संघातून माजी उपमहापौर व ज्येष्ठ नगरसेवक डॉ. राम बारोट यांचे नाव चर्चेत आहे. शिवसेनेचे महापौरपद जाऊ नये म्हणून मनसेतून शिवसेनेत ६ नगरसेवकांना घेऊन आलेले दिलीप लांडे चांदीवली मतदार संघातून काँग्रेसचे आमदार नसीम खान यांच्या विरोधात निवडणूक लढवणार आहेत. भांडूप मतदारसंघात शिवसेनेचे अशोक पाटील हे आमदार असले तरी या मतदार संघातून विभागप्रमुख व नगरसेवक रमेश कोरगावकर यांनी उमेदवारी मिळण्यासाठी जोरदार फिल्डींग लावली आहे. वडाळा विधानसभा मतदार संघातून माजी महापौर श्रध्दा जाधव या इच्छुक आहेत. परंतु, हा मतदारसंघ शिवसेनेला सोडला जाईल का यावरून वाद सुरु असल्याने जाधव यांच्या उमेदवारीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

हेही वाचा - शरद पवारांना अडचणीत आणणारी ‘ईडी’ नक्की आहे तरी काय?

वांद्रे पश्चिममधून काँग्रेसचे आसिफ झकेरिया, कुलाब्यातून भाजपचे मकरंद नार्वेकर, वर्सोव्यातून शिवसेनेचे राजू पेडणेकर, राजुल पटेल, शीव कोळीवाड्यातून भाजपच्या कृष्णवेणी रेड्डी, मुलुंडमधून प्रकाश गंगाधरे, प्रभाकर शिंदे व रजनी केणी तर युती न झाल्यास घाटकोपर पूर्वमधून शिवसेनेचे परमेश्वर कदम हे नगरसेवक इच्छुकांच्या रांगेत आहेत.

इच्छुक उमेदवारांची नावे -

  1. महापौर विश्वनाथ महाडेश्वर - वांद्रे पूर्व
  2. विरोधी पक्ष नेते रवी राजा - सायन कोळीवाडा
  3. समाजवादी पक्ष गटनेते रईस शेख - भायखळा
  4. माजी महापौर श्रध्दा जाधव - वडाळा
  5. भाजपा डॉ. राम बारोट - मालाड पश्चिम
  6. शिवसेना दिलीप लांडे - चांदिवली
  7. काँग्रेस आसिफ झकेरिया - वांद्रे पश्चिम
  8. शिवसेना रमेश कोरगावकर - भांडूप
  9. शिवसेना नगरसेवक राजू पेडणेकर - वर्सोवा
  10. शिवसेना नगरसेविका राजुल पटेल - वर्सोवा
  11. भाजप नगरसेवक अ‍ॅड. मकरंद नार्वेकर - कुलाबा
  12. भाजप नगरसेवक प्रकाश गंगाधरे, प्रभाकर शिंदे, नगरसेविका रजनी केणी - मुलुंड
  13. शिवसेना नगरसेवक परमेश्वर कदम - घाटकोपर पूर्व
  14. भाजप नगरसेविका कृष्णवेणी रेड्डी - शीव कोळीवाडा

ABOUT THE AUTHOR

...view details