नवी मुंबई - महानगरपालिकेच्या १७ विभागात कार्यरत असलेल्या ६ हजार ५०० कंत्राटी कामगारांना चौदा महिन्यांच्या थकीत वेतनातील फरक मिळणार आहे. याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीने मंजूर केला आहे. ९० कोटी रुपये कंत्राटी कामगारांना मिळावे यासाठी अमित ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महापालिका मुख्यालयावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून मोर्चा काढण्यात आला होता.
नवी मुंबई महापालिकेच्या शेकडो कंत्राटी कामगारांना मिळणार वेतनातील फरक
मुंबई महानगरपालिकेच्या ६ हजार ५०० कंत्राटी कामगारांना चौदा महिन्यांच्या थकीत वेतनातील फरक मिळणार आहे. याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीने मंजूर केला आहे.
या मोर्चात घनकचरा, मल:निस्सारण, विद्युत, पाणीपुरवठा, उद्यान, आरोग्य यांसारख्या एकूण १७ विभागातील ३ ते ४ हजार कंत्राटी कामगार सहभागी झाले होते. सर्व प्रशासकीय बाबी पूर्ण झाल्यानंतर महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी कंत्राटी कामगारांचा प्रस्ताव स्थायी समितीकडे मंजुरीसाठी पाठवला होता. शुक्रवारी(२४ जानेवारी) स्थायी समितीने हा प्रस्ताव मंजूर केला. पुढील आठवड्यात कामगारांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत. त्यामुळे अमित ठाकरेंच्या नेतृत्वाखाली निघालेल्या मोर्चाला यश मिळाले असे बोलले जात आहे.
हेही वाचा - आमचा बंद यशस्वी; तोडफोड करणारे कार्यकर्ते आमचे नाहीत..
या निर्णयामुळे कंत्राटी कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण असून त्यांनी मनसेच्या मध्यवर्ती कार्यालयाबाहेर फटाके वाजवून आणि पेढे भरवून जल्लोष साजरा केला.