महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

BMC Budget 2023 : मुंबई महानगरपालिकेचा आज अर्थसंकल्प सादर; तब्बल ३६ वर्षांनी प्रशासक अर्थसंकल्प मांडणार

मुंबई महानगरपालिकेचा आज अर्थसंकल्प सादर होणार आहे. तब्बल ३६ वर्षांनी प्रशासक अर्थसंकल्प मांडणार आहे. त्यामुळे मुंबईकरांना यंदा पायाभूत सुविधा देताना, बजेटमध्ये कोणत्या नव्या योजना, तरतुदी केल्या जातील, हे पाहणं महत्त्वाचे आहे.

BMC Budget 2023
Etv Bharatमुंबई महानगरपालिका

By

Published : Feb 4, 2023, 10:37 AM IST

Updated : Feb 4, 2023, 10:52 AM IST

मुंबई :देशाची आर्थिक राजधानी असलेल्या आणि सर्वात श्रीमंत मुंबई महानगरपालिकेचा यंदाचा अर्थसंकल्प आज सकाळी साडेदहा वाजता सादर होणार आहे. सुरुवातीला सकाळी 10.30 वाजता अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगर) आश्विनी भिडे या शिक्षण खात्याचा अर्थसंकल्प प्रशासक (महानगरपालिका) डॉ. इक्बाल सिंह चहल यांना सादर करतील. तर, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू हे बृहन्मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प प्रशासक (महानगरपालिका) डॉ. इकबाल सिंह चहल यांना सादर करतील.



सर्वात श्रीमंत महानगरपालिका :मागील वर्षी कोरोना आणि रखडलेल्या प्रकल्पांचा वेळ वाढवण्यासाठी मेळ साधणार मेगा बजेट सादर केला होता. पालिका आणि नगरसेवकांची मुदत संपल्याने निवडणूक अजून जाहीर झालेली नाही. वर्षभरापासून प्रशासक मुंबई महानगरपालिकेचा कारभार हाकत आहेत. त्यामुळे मुंबईकरांना यंदा पायाभूत सुविधा देताना, बजेटमध्ये कोणत्या नव्या योजना, तरतुदी केल्या जातील, हे पाहणे महत्त्वाचे आहे. मागील वर्षी ५०० चौरस फुटाच्या घरांना मालमत्ता करात सूट देण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला होता. महानगरपालिकेच्या मुख्य आर्थिक स्रोत असलेल्या मालमत्ता करात अपेक्षित वाढ वसुली झाली नव्हती.

पायाभूत सुविधा पुरवण्यावर भर :यंदा अर्थसंकल्प सादर करताना मुंबईकरांच्या आरोग्यासह, प्रदूषण नियंत्रण आणि पारदर्शकत्याबरोबरच कोणतेही कर लादू नयेत, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी आयुक्तांना दिल्या आहेत. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर हा अर्थसंकल्प सादर होत असल्याने राज्य सरकारची यावर छाप असेल. दुसरीकडे आदित्य ठाकरे यांनी महापालिकेचा अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी प्रशासक इकबाल सिंग चहल यांना पत्र पाठवून, निवडणुकीच्या तोंडावर वाद्यमापोषण करू नका, चालू प्रकल्प वगळता नव्या प्रकल्पांवर निधी खर्च करणे नैतिकदृष्टीने चुकीचे असल्याचे म्हटले आहे. सध्या राजकीय आरोप प्रत्यारोपाच्या वादात प्रशासक कशाप्रकारे सुवर्ण मध्ये काढणार हे पाहणे महत्त्वाचे आहे.



महत्त्वकांक्षी योजनांवर लक्ष :मुंबई महापालिकेचा महत्त्वकांक्षी आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतील कोस्टल रोड हा प्रकल्प 60 टक्के पूर्ण झाला आहे. या प्रकल्पासाठी अंदाजित सुमारे पाच हजार कोटीची तरतूद होण्याची शक्यता आहे. वेस्ट टू एनर्जी, मिठी नदी, गोरेगाव मुलुंड रोड, क्रॉफर्ड मार्केटचे रखडलेले काम पूर्ण करण्यासाठी भरीव निधीची तरतूद होण्याची शक्यता आहे. मुंबईला मुबलक पाणीपुरवठा करण्यासाठी पवई, घाटकोपर, अमर महल ते परळच्या सदाकांत ढवण मैदानापर्यंत जलबोगदा तयार केला जाणार आहे. सुमारे ९०० कोटींची आर्थिक तरतूद होण्याची शक्यता आहे. या शिवाय शिक्षण विभागाच्या अर्थसंकल्पातून महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा :Devendra Fadnavis on Kasba Chinchwad Election : कसबा, चिंचवड निवडणूक बिनविरोध करण्यासाठी आवाहन करणार - फडणवीस

Last Updated : Feb 4, 2023, 10:52 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details