माहिम दर्ग्यावरील अनधिकृत बांधकामांवर कारवाई मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवतीर्थ मैदानावरील सभेत मजारीच्या अनधिकृत बांधकामाचा व्हिडिओ दाखविला. त्यानंतर अनिधकृत बांधकमातून माहिमधील समुद्रपरिसरात नवा हाजीअली दर्गा तयार करण्यात येत असल्याचा दावा मनसे अध्यक्षांनी केल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. राज ठाकरे यांच्या दाव्यानंतर मुंबई महापालिका, मुंबई जिल्हा प्रशासन आणि पोलीस दल सक्रिय झाले. आज (23 मार्च) सकाळी जिल्हा प्रशासनाकडून मजार तोडण्यासाठी बीएमसीच्या मदतीने पोलिसांच्या फौजफाटासह कारवाई करण्यात आली आहे. महिन्याभराच्या आत हे अनधिकृत बांधकाम तोडले नाही तर आम्ही त्याच ठिकाणी गणपतीचे मोठे मंदिर बांधून दाखवू, असा इशारा राज ठाकरेंनी सभेत दिला होता. सुरुवातीला माहिमधील अनधिकृत बांधकामाबाबत बीएमसीने आपल्या अखत्यारीत विषय नसल्याचे म्हटले होते.
केवळ अनधिकृत बांधकामावरच कारवाई : सामनाने या अनधिकृत बांधकामाची बातमी २०१७ मध्ये दिल्याचे फोटो समाज माध्यमातून समोर येत आहेत. माहिममधील सर्व धार्मिक स्थळांवर पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला होता. माहिमच्या समुद्र किनारी असलेल्या मजारीच्या बाजूला करण्यात आलेल्या बांधकामांवर पालिकेने कारवाई करण्यात आली. पालिकेचे अधिकारी जेसीबीसह मजारीच्या ठिकाणी दाखल झाले होते. ही मजार जुनी असल्याने केवळ अनधिकृत बांधकामावर सध्या कारवाई केली असल्याचे सांगितले. राज ठाकरे यांनी माहिमच्या समुद्रात अनधिकृत बांधकाम केले जात असल्यानंतर मेरिटाईम बोर्डाच्या उपस्थितीत बांधकामावर कारवाई करण्यात आली आहे.
कबर अधिकृत असल्याचा माहीम दर्गा ट्रस्टचा दावा :समुद्रकिनारी माहीमच्या समुद्रकिनारी हजरत मकदूम अली शाह हे याच जागी बसून हजरत ख्वाजा खिजर अली शाह यांच्याकडून शिक्षण घ्यायचे. या ठिकाणी सहाशे वर्षांहून अधिक जुनी कबर आहे. या कबरीच्या बाजूला गेल्या काही वर्षात अनधिकृत बांधकाम करण्यात आले आहे. कबर नोंद असल्याचा दावा माहीम दर्गा ट्रस्टने केला आहे. समुद्र किनारी ही जागा आहे. या अनधिकृत बांधकामाकडे मेरीटाईम बोर्डाने पूर्णपणे दुर्लक्ष केल्याच समोर आले आहे.
म्हणून पालिका कारवाई करणार -माहीम समुद्रकिनारी असलेल्या दर्ग्यात मजारीच्या बाजूला अनधिकृत बांधकाम केल्यामुळे मेरीटाईम बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी मोजमापणी केली आहे. जितकी जागा मजारीची आहे. ती जागा वगळता इतर जागेवर करण्यात आलेले बांधकाम अनधिकृत असल्याने त्यावर कारवाई केली जाणार आहे. यासाठी मेरीटाईम बोर्डाने कारवाईसाठी पालिकेची मदत मागितली होती. महापालिकेकडे तोडक कारवाईसाठी लागणारे मशिनरी आणि मनुष्यबळ असल्याने पालिकेला मुंबईतील अनधिकृत बांधकाम तोडते. पालिकेचे अधिकारी जेसीबी आणि इतर मशिनरी तसेच मनुष्यबळ घेवून माहीम किनाऱ्यावर पोहोचले. मजारीच्या बाजूला करण्यात आलेल्या अनधिकृत बांधकामावर पालिकेकडून कारवाई करण्यात आली आहे. मेरीटाईम बोर्डाचे अधिकारीही कारवाईच्या ठिकाणी उपस्थि राहिले.
हेही वाचा :Raj Thackeray on Dargah : माहिमचे अनधिकृत दर्ग्याचे बांधकाम राज ठाकरेंनी केले उघड; म्हणाले, '.....तर गणपती मंदिर उभारू'