महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

हानिकारक सरबत सापडल्यास विक्रेत्याला न्यायालयात खेचणार - health

मुंबईसह राज्यभरात मार्च अखेरीस पारा ४० अंशापेक्षा जास्त गेला आहे.  उकाड्यापासून दिलासा मिळवण्यासाठी नागरिक सरबत पिण्यासाठी जातात.

हानिकारक सरबत सापडल्यास विक्रेत्याला न्यायालयात खेचणार

By

Published : Mar 29, 2019, 11:58 PM IST

मुंबई - कुर्ला रेल्वे स्थानकावर घाणेरड्या पद्धतीने लिंबू सरबत बनवणारा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यानंतर रेल्वे प्रशासनाने त्यावर बंदी घातली. यानंतर मुंबई पालिकेनेही मुंबईत धडक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये आरोग्याला हानिकारक सरबत, थंड पेये आढळल्यास विक्रेत्याला थेट न्यायालयात खेचण्याचा तसेच परवाना रद्द करण्याच्या निर्णय घेतला आहे.


पालिकेच्या सर्वच २४ वॉर्डमध्ये विशेष पथकाकडून धडक कारवाई सुरू करण्यात आली असल्याची माहिती एका अधिकाऱ्याने दिली. मुंबईसह राज्यभरात मार्च अखेरीस पारा ४० अंशापेक्षा जास्त गेला आहे. उकाड्यापासून दिलासा मिळवण्यासाठी नागरिक सरबत पिण्यासाठी जातात. मात्र, कुर्ला स्थानकावरील व्हिडिओमुळे मुंबईकरांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर ‘एफडीए’ने धडक कारवाई सुरू केली असून रेल्वे प्रशासनाने तर स्थानकावरील लिंबू सरबत आणि कालाखट्टावर बंदी घातली आहे. त्यामुळे मुंबईत विकले जाणारे सरबत, शीतपेये यावर पालिकेने कारवाई सुरू केली आहे. दरम्यान, शीतपेय विक्रेत्यांसह खाद्यपदार्थ विकणार्‍यांवरही कारवाई सुरू आहे. यामध्येही अस्वच्छता, आरोग्यास हानिकारक पद्धतीने काम होत असल्याचे समोर आल्यास त्यांच्यावरही कारवाई करण्यात येणार असल्याचे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले.


तर परवाना रद्द होणार
पालिका अधिकारी-कर्मचारी सरबत विक्रेत्यांकडून नमुने ताब्यात घेत आहेत. सरबत बनवण्याच्या प्रक्रियेवर नजरही ठेवली जात आहे. यामध्ये विकली जाणारी शीतपेये आरोग्यास हानीकारक असल्याचे समोर आल्यास तातडीने सर्व साठा नष्ट करण्यात येत आहे. संबंधित विक्रेत्यावर न्यायालयीन कारवाई सुरू करण्यात येत आहे. पेय आरोग्यास हानीकारक असल्याचे न्यायालयात स्पष्ट झाल्यास परवानाही रद्द होऊ शकतो, अशी माहिती पालिका अधिकार्‍याने दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details