मुंबई -महापालिकेने मातोश्री बाहेरील शिवसेनेच्या होर्डिंग्जवर कारवाई केली आहे. यावर 'आपला आमदार आपला मुख्यमंत्री' असे लिहिले होते. आता हा फलक पालिकेने काढून टाकला आहे. राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर ही कारवाई केल्याचे दिसत आहे.
मातोश्री बाहेरील होर्डिंग्जवर पालिकेची कारवाई हेही वाचा - शिवसेना आणि महाआघाडीतला 'किमान समान कार्यक्रम' जाणून घ्या...
महापालिकेच्या कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांना याबाबत कारण विचारले असता त्यांनी उत्तर द्यायला मात्र टाळाटाळ केली आहे.
राष्ट्रपती राजवट -
भाजपने सत्ता स्थापनेसाठी असमर्थता दर्शवल्यानंतर शिवसेनेला सत्ता स्थापनेसाठी विचारणा करण्यात आली. मात्र, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे पाठिंब्याचे पत्र न मिळाल्याने शिवसेनादेखील सत्ता स्थापन करू शकली नाही. मात्र, त्यांनी राज्यपालांना वेळ वाढवून मागितला होता. त्यांनी तो वेळ नाकारला. त्यानंतर राज्यपालांनी राष्ट्रवादीला विचारणा केली. मात्र, राष्ट्रवादीने देखील अवधी मागितला होता. राज्यपालांनी त्यांना देखील वेळ वाढवून देण्यास नकार दिला. त्यामुळे राज्यपालांनी राष्ट्रपती राजवटीची शिफारस केली. त्यानंतर आता राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे.
हेही वाचा - आरटीआयच्या चौकटीत सरन्यायाधीशांचे कार्यालय येणार? सर्वोच्च न्यायालयात आज निर्णय