महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

"खासगी दवाखाने सहकार्य करीत नसल्याने आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू करा" - mumbai corona

खासगी डॉक्टरांना आवश्यक ते आरोग्याचे सुरक्षिता किट उपलब्ध करून देऊन त्यांना शासकीय रुग्णालयात सेवा देण्यासाठी जागा उपलब्ध करून द्याव्यात तसेच खासगी रुग्णालयांकडून कोरोना चाचण्यांसाठी आकारण्यात येणारे दर शासनाकडून प्रमाणित केले जावेत, अशी मागणी भाजप आमदार शेलार यांनी केली आहे

blp leadar ashish shelar
भाजप आमदार शेलार

By

Published : Apr 2, 2020, 5:49 PM IST

मुंबई - खासगी दवाखाने आणि रुग्णालयात साधा ताप, खोकला अशा रुग्णांना उपचार करण्यात येत नाहीत त्यामुळे रुग्णांची गैरसोय होते आहे. त्यामुळे खासगी रुग्णालयातील कोरोना चाचणीचे दर निश्चित करून ही चाचणी आरोग्य विम्यातून करण्याची परवानगी द्यावी. तसेच आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू करण्याची मागणी भाजप नेते आमदार अ‌ॅड. आशिष शेलार यांनी केली आहे. शेलार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवलेल्या पत्रात ही मागणी केली आहे.

भाजप नेते शेलार यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र -

मुख्यमंत्री ठाकरे यांना लिहीलेल्या पत्रात शेलार म्हटले आहे की, शहरातील खासगी दवाखाने, रुग्णालये, नर्सिंग होम, वारंवार सरकारने विनंती करूनही डॉक्टर सुरू करत नाहीत. त्यामुळे कोरोना व्यतिरिक्त अन्य आजारांच्या रुग्णांची मोठी गैरसोय होते आहे. कोरोना व्यतिरिक्त अन्य आजारांवरील ऑपरेशन आणि उपचार ठप्प झाले आहेत. विशेषत: उन्हाळा वाढू लागल्यामुळे सर्दी ताप खोकला, असे आजार वाढत असून या रुग्णांना उपचार घेणे शक्य होत नाही. तसेच मुख्यमंत्री महोदय आपण व्यक्त केलेल्या भीतीप्रमाणे निमोनियाची साथही पसरण्याची शक्यता आहे. या सर्व साथीच्या आजारांना नियमित वर्षभर उपचार करणारी शहरातील सर्व यंत्रणा ठप्प असून रुग्णांची प्रचंड गैरसोय होते आहे.

शेलार म्हणाले, जे खासगी रुग्णालये सुरू आहेत, ते तापाच्या रुग्णांना दाखल करून न घेता सरकारी दवाखान्यात पाठवून देत आहे. त्यांच्या प्राथमिक तपासणीही केली जात नाही त्यामुळे पर्यायाने सरकारी रुग्णालयावर ताण येतो आहे. त्यामुळे आंध्र प्रदेशच्या धर्तीवर आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू करावा आणि त्याची कठोर अंमलबजावणी करून राज्य शासनाने शहरातील सर्व खासगी दवाखाने, हॉस्पिटल, नर्सिंग होम आदी सर्व आरोग्य यंत्रणा मर्यादित काळासाठी शासनाच्या नियंत्रणात घ्याव्यात. तातडीने कोरोना व्यतिरिक्त अन्य उपचार यंत्रणा सर्वसामान्य्य्य रुग्णांना उपलब्ध करून देण्यात यावी.

खासगी एमबीबीएस डॉक्टरांनी आपले दवाखाने बंद ठेवले आहेत त्यामुळे सर्दी-खोकला सारख्या साथीच्या आजारांवरील उपचार होत नाहीत. डॉक्टरांच्या आरोग्याच्या सुरक्षेसाठी त्यांच्याकडे यंत्रणा नसल्याचे कारण सांगत हे दवाखाने डॉक्टर चालू करण्यास तयार नाहीत. यातील काही डॉक्टरांना आवश्यक ते आरोग्याचे सुरक्षिता किट उपलब्ध करून देऊन त्यांना शासकीय रुग्णालयात सेवा देण्यासाठी जागा उपलब्ध करून द्याव्यात खासगी रुग्णालयांकडून कोरोना चाचण्यांसाठी आकारण्यात येणारे दर शासनाकडून प्रमाणित केले जावेत. कोरोना चाचणी केवळ विशिष्ट डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनवरच केल्या जातात. राज्य सरकारने 'आयआरडीएला' संपर्क करून आरोग्य विमाधारक व्यक्तींना या चाचण्यांचा खर्च त्यांच्या विद्यमान विमा योजनेंतर्गत करण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणीही भाजप आमदार शेलार यांनी केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details