मुंबई- दृष्टीहिनांच्या अंधकारमय आयुष्यात 'कल्पनारुपी' प्रकाशवाट येऊन ही प्रकाशवाट जीवनाच्या वाटचालीत आनंद देत राहावी, या उद्देशाने दादरच्या कमला मेहता अंध विद्यालयात जल्लोषात दिवाळी साजरी केली गेली. यावेळी दृष्टीहीन विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहण्यासारखा होता.
दृष्टीहीन विद्यार्थिनींनी जल्लोषात साजरी केली दिवाळी
दृष्टीहिनांच्या अंधकारमय आयुष्यात 'कल्पनारुपी' प्रकाशवाट येऊन ही प्रकाशवाट जीवनाच्या वाटचालीत आनंद देत राहावी, या उद्देशाने दादरच्या कमला मेहता अंध विद्यालयात जल्लोषात दिवाळी साजरी केली गेली
दादर येथील कमला मेहता अंध विद्यालयातील विद्यार्थीनींनी नवीन कपडे परिधान करत पणत्या पेटवल्या. गाणी गात विद्यार्थीनींनी सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. तर यावेळी काढण्यात आलेली फुलांची रांगोळी आणि सजावट लक्ष वेधून घेत होती. दिवाळीच्या सुट्टीआधी दरवर्षी शाळेत मोठ्या उत्साहात दिवाळी साजरी करण्यात येते.
या शाळेत 160 अंध विद्यार्थीनी असून त्यापैकी 140 तेथीलच वसतीगृहात राहतात. दिवाळीच्या सुट्टीत हे विद्यार्थी घरी जाण्याआधी त्यांच्याबरोबर आम्ही दिवाळी साजरी करत असल्याचे शाळेच्या उपमुख्यधापिका स्वप्नाली सोनावणे यांनी सांगितले.