मुंबई :
अंध खेळाडूंचा ट्वेन्टी-२० विश्वचषक अंध खेळाडूंच्या तिसरी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धा नुकतीच सुरु ( Blind Cricketer Twenty20 World Cup ) झाली. काल बांगलादेशने श्रीलंकेला हरवले. बांगलादेशचा खेळाडू सलमान (नाबाद ९१) आणि आबिद (७६) यांच्या अर्धशतकी खेळीनंतर गोलंदाजांनी केलेल्या जोरदार कामगिरीच्या जोरावर ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत बांगलादेशने ऑस्ट्रेलियावर १०२ धावांनी मोठा विजय ( Bangladesh won by 102 runs )नोंदवला.
सचिन तेंडुलकर जिमखाना : कांदिवलीच्या सचिन तेंडुलकर जिमखाना (एमसीए) येथे काल झालेल्या लढतीत प्रथम फलंदाजी करणाऱ्या बांगलादेशची सुरुवात चांगली झाली नाही. कर्णधार मोहम्मद अशिकूर रहमान (४) लवकर माघारी परतला. यानंतर सलमान (५८ चेंडूंत ९१ धावा ) आणि आबिद (३९ चेंडूंत ७६ धावा ) यांनी संघाच्या दुसऱ्या गडीसाठी १४२ धावांची भागिदारी रचली. त्यांच्या या कामगिरीमुळे संघाने निर्धारित २० षटकात ३ बाद २२५ धावसंख्येपर्यंत मजल ( Australia lost Match ) मारली. ऑस्ट्रेलियाकडून ब्रेवर नेडने दोन विकेट्स मिळवले.
बांगलादेशची गोलंदाजी प्रभावी : आव्हानाचा पाठलाग करणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांचा बांगलादेशच्या गोलंदाजीसमोर निभाव लागला नाही. वॅलेस लाचल (२०) आणि कर्णधार मॅककार्थी मॅट (१७) वगळता कोणालाही फलंदाजीत चुणूक दाखवता आली नाही. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला १९.४ षटकांत १२३ धावाच करता आल्या. बांगलादेशकडून सलमान (२/१६) आणि तांझील (२/२९) यांनी गोलंदाजीत चमक दाखवली.
सलमान सामनावीर : ''सलमानने केलेल्या अष्टपैलू कामगिरीसाठी त्याची सामनावीर म्हणून निवड करण्यात आली. या सामन्याकरता माजी महापौर किशोरी पेडणेकर, 'एमसीए'चे माजी पदाधिकारी जगदीश आचरेकर, नदीम मेमन यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती. डोळस खेळाडूंच्या क्रिकेट स्पर्धाबाबत खूप प्रसिद्धी होते. मात्र आमच्या अंधांच्या किंवा इतर दिव्यांग खेळाडूंच्या खेळाबाबत जनता देखील दुर्लक्ष करते. तेव्हा सर्वानी या सामन्याकडे देखील लक्ष देण्याचे आवाहन अंध खेळाडू नेहा पावसकर यांनी सांगितले. हि आमची तिसरी आंतरराष्ट्रीय स्पर्धा आहे. '' असे त्या ( World Cup Cricket Tournament ) म्हणाल्या.