महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

भाजपाने रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार केला - नवाब मलिक

अमळनेरचे भाजपचे नेते शिरीष चौधरी यांनी आपल्या हॉटेल हिरा एक्झिक्यूटीव्हमध्ये 700 इंजेक्शन्स कशी वाटली, असा प्रश्नही नवाब मलिक यांनी केला. तसेच 20 हजार इंजेक्शन साठवून भाजपाने त्याचा काळाबाजार केल्याचा आरोपही नवाब मलिक यांनी केला.

black marketing of remedesivir injection
भाजपाने रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार केला - नवाब मलिक

By

Published : Apr 20, 2021, 5:19 PM IST

मुंबई -नंदुरबारमधील अमळनेरमधील भाजपचे नेते शिरीष चौधरी यांच्याकडे रेमडेसिवीरचा साठा कसा, असा प्रश्न राज्याचे अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक यांनी आज पत्रकार परिषद घेऊन उपस्थित केला. यासोबतच एफडीआयच्या नियमाप्रमाणे कोणत्याही खासगी संस्थेला किंवा व्यक्तीला रेमडेसिवीरची खरेदी करता येत नाही. मग, अमळनेरचे भाजपचे नेते शिरीष चौधरी यांनी आपल्या हॉटेल हिरा एक्झिक्यूटीव्हमध्ये 700 इंजेक्शन्स कशी वाटली, असा प्रश्नही नवाब मलिक यांनी केला. तसेच 20 हजार इंजेक्शन साठवून भाजपाने त्याचा काळाबाजार केल्याचा आरोपही नवाब मलिक यांनी केला.

ब्रूक फार्माला काळाबाजार करण्यासाठी भाजपची मदत? -

अमळनेरचे भाजपचे नेते शिरीष चौधरी यांनी आपल्या हॉटेल हिरा एक्झिक्यूटीव्हमध्ये रेमडेसिवीरचे वाटप केले असून या संबंधीची कागदपत्रे आणि हॉटेलमध्ये वाटप केलेल्या इंजेक्शनचा व्हिडिओ यावेळी नवाब मलिक यांनी दाखवला. तसेच ब्रूक फार्मा यांच्या व्यवस्थापनावरदेखील त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. गुजरातमध्ये ब्रूक फर्माने रेमडेसिवीर औषधाचा काळाबाजार केला आहे. त्याच ब्रूक फार्मा कंपनीच्या व्यवस्थापनासोबत बैठक करून महाराष्ट्रादेखील 50 हजार रेमडेसिवीर इंजेक्शन आणणार असल्याचे सांगितले होते. त्यामुळे महाराष्ट्रातदेखील ब्रूक फार्माला काळाबाजार करण्यासाठी भाजप नेते मदत करणार होते काय, असा प्रश्नदेखील नवाब मलिक यांनी आपल्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून उपस्थित केला.

नंदुरबारच्या जिल्हाधिकाऱ्यांना कारवाई करण्याचे आदेश -

सध्या राज्यात रेमडेसिवीर तसेच ऑक्‍सिजनचा मोठा तुटवडा जाणवत आहे. यामुळे अनेक रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले आहे. अशी परिस्थिती असताना ब्रूक फार्मा ही कंपनी गुजरातमध्ये काळाबाजार करते. त्याच कंपनीसाठी महाराष्ट्रातील दोन्ही विरोधीपक्ष नेते धावून येतात. याचा अर्थ काय समजावा, असा प्रश्नदेखील त्यांनी यावेळी उपस्थित केला. नंदुरबारमध्ये शिरीष चौधरी यांनी 8 एप्रिल आणि 12 एप्रिल या दोन दिवशी 700 इंजेक्शनचे वाटप केले. ते कशाच्या आधारावर केले, असेही त्यांनी विचारले. तसेच केवळ दाखवण्यापुरते 700 इंजेक्शनचे वाटप झाले असले, तरी हिरा एक्झिक्यूटीव्ह हॉटेलमध्ये जवळपास 20 हजार इंजेक्शनचा काळाबाजार केल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला. अमळनेरमध्ये रेमडीसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार झाला असल्याने एफबीआयने नंदुरबारच्या जिल्हाधिकाऱ्यांना तसे पत्र लिहून कारवाई करण्याचे आदेशदेखील दिले असल्याचे नवाब मलिक यांनी आपल्या पत्रकार परिषदेत सांगितले. तसेच सध्या अनेक राज्यामध्ये आरोग्य विषयक गंभीर परिस्थिती आहे. मात्र, ही परिस्थिती निवळल्यानंतर भाजपच्या आणखी दोन नेत्यांचे भ्रष्टाचार आपण समोर आणणार असल्याचा इशारा नवाब मलिक यांनी दिला.

रेमडेसिवीर प्रकरणात केंद्राने लक्ष द्यावे -

सध्या राज्यभरात रेमडेसिवीरचा तुटवडा मोठ्या प्रमाणात जाणवतो आहे. यातच भाजपचे काही नेते रेमडेसिवीरची खरेदी करून काळाबाजार करत असल्याचा, आरोप मलिक यांनी केला. त्यामुळे यामध्ये थेट केंद्र सरकारने लक्ष घालून त्वरित कारवाई करावी, अशी मागणी नाव मलिक यांच्याकडून करण्यात आली.

हेही वाचा - लॉकडाऊनचा निर्णय होणार? साडेतीन वाजता मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक

ABOUT THE AUTHOR

...view details