मुंबई -लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर सरकार हल्ला करत आहे. माध्यमांना स्वतंत्रपणे काम करू दिले जात नाही. माध्यमांची मुस्कटदाबी केली जात असल्याचा आरोप करत आज (दि. 2 नोव्हेंबर) भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने मंत्रालयाबाहेर आंदोलन करण्यात आले.
यावेळी भाजयुमो कार्यकर्त्यांनी भारत माता की जय व तसेच सरकारविरोधात घोषणा देत परिसर दणाणून सोडला. भाजयुमो आंदोलन करणार असल्यामुळे मंत्रालयाबाहेर पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. कोरोनाच्या प्रादुर्भावाची खबरदारी व आंदोलनाची परवानगी नसल्याने पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.