मुंबई :राज्यातील मंदिरं सर्वसामान्य लोकांसाठी खुली करण्यात यावी. यासाठी भारतीय जनता पक्षाकडून आज (30 ऑगस्ट) राज्यभर शंखानाद आंदोलन करण्यात येणार आहे. याआधीही राज्य सरकारने मंदिरं खुली करण्यासाठी इशारा भारतीय जनता पक्षाच्या अध्यात्मिक आघाडीने दिला होता. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव कमी होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. हॉटेल, मॉल्स आणि दारूची दुकानं सर्व अटी नियम लागू करून खुली करण्याला राज्य सरकारने परवानगी दिली. मग मंदिरातही दर्शनासाठी अटी नियम लावून मंदिरं खुली करण्यात यावी, अशी मागणी सातत्याने भारतीय जनता पक्षाकडून होत आहे. त्यामुळे आज राज्यभरात मंदिरांसमोर शंखनाद आंदोलन करण्याचा इशारा भारतीय जनता पक्षाकडून देण्यात आला आहे.
तिसऱ्या लाटेची शक्यता, निर्बंध कडक होणार?