मुंबई : टिपू सुलतान नामकरणाच्या वादावरून भारतीय जनता पक्ष आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फेर्या सुरू आहेत.
भाजपचा टिपू सुलतान बाबतचा विरोध खोटेपणावर आधारित -मलिक - Bharatiya Janata Party
टिपू सुलतान (Tipu Sultan) बाबतचा भारतीय जनता पक्षाचा (Bharatiya Janata Party) विरोध हा खोटेपणा वर आधारित आहे. भाजपकडून खोटा इतिहास रचला जातोय. (False history is being fabricated) संविधानाच्या मूळ प्रतीवर राणी लक्ष्मीबाई आणि टिपू सुलतान यांच्या पराक्रमाला स्थान देण्यात आल आहे. मात्र भाज कडून संविधान बदलण्याच्या बाबत सातत्याने वक्तव्य केली जातात असे ट्विट राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Minister Nawab Malik) यांनी केले आहे.
नवाब मलिक
सत्तेवर येण्या आधी कर्नाटकमध्ये भाजपचे नेते येदुराप्पा हे टिपू सुलतान यांची जयंती साजरी करत होते. मात्र मुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी निर्णय बदलला.
तसेच राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी टिपू सुलतान यांना धाडसी शहीदाचा दर्जा देताना देश त्यांना विसरु शकत नाही, असे भाषण केले होते. याची आठवणही भाजपला नवाब मलिक यांनी याआधी करुन दिली होती.