मुंबई - उत्तर मुंबईचे भाजपचे विद्यमान खासदार गोपाळ शेट्टी यांच्या संपत्तीत ५ वर्षांमध्ये ६ कोटी रूपयांनी वाढ झाली आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत गोपाळ शेट्टी यांच्याकडे ९.५६ कोटींची संपत्ती होती. यावेळी दाखल केलेल्या शपथपत्रातून त्यांच्या संपत्तीत ६५ टक्क्यांची वाढ झाल्याची माहिती समोर आली आहे. यावेळी त्यांनी भरलेल्या शपथपत्रात त्यांच्याकडे १५.७८ कोटींची संपत्ती असल्याचे म्हटले आहे.
५ वर्षांत गोपाळ शेट्टींच्या संपत्तीत ६५ टक्क्यांनी वाढ -
मुंबई उत्तरचे भाजपचे विद्यमान खासदार गोपाळ शेट्टी यांच्या संपत्तीत ५ वर्षांमध्ये ६ कोटी रूपयांची वाढ झाली आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत गोपाळ शेट्टी यांच्याकडे ९.५६ कोटींची संपत्ती होती. या निवडणूकीत सादर केलेल्या शपथ पत्रात त्यामध्ये वाढ झाल्याचे दिसत आहे.
शपथ पत्रात दिलेल्या माहितीनुसार गोपाळ शेट्टी यांनी जाहीर केलेल्या संपत्तीमध्ये स्थावर, जंगम आणि बचतीचा समावेश आहे. २०१४ साली त्यांच्याकडे ९.५६ कोटींची संपत्ती होती. तर २०१९ मध्ये त्यात वाढ होऊन ती १५.७८ कोटी रूपये झाली आहे. २०१३ ते २०१८ या कालावधीत गोपाळ शेट्टी यांनी ३५.९९ लाख रूपयांचा तर त्यांच्या पत्नीने याच कालावधीसाठी २१.२४ लाखांचा आयकर भरला असल्याचेही त्यांनी आपल्या शपथपत्रात नमूद केले आहे.