मुंबई- राज्यात भाजप-शिवसेना यांची एकीकडे युती झाली असली तरी यातून मोठी बंडाळी देखील समोर येत आहे. मुंबईच्या चांदीवली मतदार संघातून शिवसेनेचे दिलीप लांडे उमेदवार आहेत. परंतु, त्यांच्यासमोर भाजप युवा मोर्चाचे राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य शुभ्रन्शु दीक्षित यांच्या पत्नीने अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला आहे.
चांदीवलीत शिवसेना उमेदवाराच्या विरोधात भाजप युवा मोर्चाचे शुभ्रन्शु दीक्षितांच्या पत्नीचा अर्ज - chandivali Assembly Constituency
चांदीवली मतदार संघातून शिवसेनेचे दिलीप लांडे उमेदवार आहेत. त्यामुळे भाजप कार्यकर्ते नाराज झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर भाजप युवा मोर्चाचे राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य शुभ्रन्शु दीक्षित यांच्या पत्नीने अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला आहे.
हेही वाचा-राणे समर्थक सतीश सावंत कणकवलीतून अपक्ष लढणार; नितेश राणेंना फोडणार घाम?
चांदीवलीमध्ये भाजप कार्यकर्ते नाराज आहेत. उत्तरभारतीय देखील नाराज असल्याने आपण पत्नीला इथून उभे केले असल्याचे दीक्षित यांनी उमेदवारी अर्जभरुन आल्यावर प्रतिक्रिया दिली आहे. अनेक ठिकाणी जिथे भाजपचे उमेदवार आहेत, तिथे शिवसेनेचे पदाधिकारी आणि जिथे शिवसेनेचे उमेदवार आहेत, तिथे भाजपचे पदाधिकरी, अशा प्रकारे बंडाळी करीत आहेत. त्यामुळे आता युती समोर ही एक नवी डोके दुखी ठरत आहे.