मुंबई : भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाकडून काढण्यात आलेल्या मोर्चातील कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. जरी युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे, तरी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या जितेंद्र आव्हाड यांना दोन कानाखाली लावण्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. असा इशारा भाजपचे युवा मोर्चाचे नेते तेजेंद्र सिंह तिवानी यांनी दिला आहे. तसेच आपण राष्ट्रवादीच्या कार्यालयात जाऊन जितेंद्र आव्हाड यांच्या राजीनाम्याची मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले. मोर्चा दरम्यान भाजपचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. भाजप कार्यकर्त्यांनी यावेळी जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे. जितेंद्र आव्हाड यांच्या फोटोंना काळे फासण्यात आले.
पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले : भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाचे कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयाच्या दिशेने जात असताना छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस बाहेरच्या परिसरामध्ये पोलिसांनी भारतीय जनता पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांना अडवले. दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते समोरा समोर येऊ नये याची दक्षता घेत पोलिसांनी भारतीय जनता पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांना ताब्यात घेतला आहे. पोलिसांनी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना रस्त्यातच अडवल्यानंतर त्याच ठिकाणी कार्यकर्त्यांनी आंदोलनाला सुरुवात केली जितेंद्र आव्हाड यांच्या पोस्टरला चपलांनी भारत त्यांच्या छायाचित्राला काळे फासण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केला.