मुंबई - चांदीवलीचे शिवसेना आमदार दिलीप लांडे यांनी भाजप खासदार पूनम महाजन यांच्याबद्दल विधानसभेत अपमानास्पद वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ शनिवारी साकीनाका भाजप कार्यलयापासून आमदार लांडे यांच्या घरापर्यंत निषेध मोर्चा काढला. मात्र, पोलिसानी ९० फूट रस्त्यावर हा मोर्चा अडवला.
शिवसेना आमदार दिलीप लांडे यांच्या घरावर भाजपचा मोर्चा
खासदार पूनम महाजन यांनी कुर्ल्यातील विमानतळाजवळच्या क्रांतीनगर आणि संदेशनगर येथील राहिवाशांना प्लास्टिकच्या चाव्या वाटतात, असे सभागृहात लांडे यांनी केलेल्या वक्तव्याविरोधात हा निषेध मोर्चा काढण्यात आला.
हेही वाचा -कामगारांच्या देशव्यापी संपाला शिवसेनेचा पाठिंबा
साकिनाका भाजपा कार्यालयापासून या मोर्चाला सुरुवात झाली. या मोर्चात महिलांसह युवा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. दिलीप लांडे यांच्या विरोधात यावेळी घोषणाबाजी करण्यात आली. लांडे यांच्या घरापर्यंत जाणाऱ्या या मोर्चाला पोलिसांनी थांबवले. खासदार पूनम महाजन यांनी कुर्ल्यातील विमानतळाजवळच्या क्रांतीनगर आणि संदेशनगर येथील राहिवाशांना प्लास्टिकच्या चाव्या वाटतात, असे सभागृहात लांडे यांनी केलेल्या वक्तव्याविरोधात हा निषेध मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात जिल्हाध्यक्ष सुषम सावंत, नगरसेवक हरीश भांदिर्गे, नितेश सिंह यांनी या मोर्चाला संबोधीत केले.
TAGGED:
bjp workers agitation mumbai