महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Nov 19, 2022, 5:47 PM IST

ETV Bharat / state

Shraddha Murder Case : श्रद्धा वालकरची हत्या हा लव जिहादचा प्रकार, भाजप महिला मोर्चाचे आंदोलन

श्रद्धा खून प्रकरणातील ( Shraddha Murder Case ) श्रद्धा वालकर या तरुणीचा मारेकरी प्रियकर आफताब पूनावाला याला लवकरात लवकर कठोर शिक्षा व्हायलाच पाहिजे, या मागणीसाठी भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चाच्या वतीने दादर पूर्व रेल्वे स्थानकाबाहेर आंदोलन करण्यात आले.

Shraddha Murder Case
भाजप महिला मोर्चाच्या वतीने आंदोलन

मुंबई : दिल्लीत झालेल्या श्रद्धा वालकर हत्या प्रकरणाच्या ( Shraddha Murder Case ) निषेधार्थ भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चाने दादर पूर्व रेल्वे स्थानकाबाहेर आंदोलन केले. श्रद्धा वालकर या तरुणीचा मारेकरी प्रियकर आफताब पूनावाला याला लवकरात लवकर कठोर शिक्षा व्हायलाच पाहिजे, या मागणीसाठी भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चाच्या वतीने आंदोलन करण्यात आले.

भाजप महिला मोर्चाच्या वतीने आंदोलन करण्यात आले

लव जिहादचा प्रकार -श्रद्धा वालकर हे प्रकरण लव जिहाद प्रकरण असून अशा प्रकरणांना आळा घालण्यासाठी कडक कायदे करावेत, अशी मागणी त्यांच्याकडून करण्यात आली आहे. राज्यामध्ये आता शिंदे फडणवीस सरकार आहे. त्यामुळे राज्यात लवकरात लवकर धर्मांतर विरोधी कायदा आणला गेला पाहिजे. लव जिहादच्या माध्यमातून हिंदू तरुणींना फसवण्याचे रॅकेट सुरू आहे. मुस्लिम तरुण हिंदू तरुणींना आपल्या प्रेमात पडून त्यांच्याशी लग्न करतात आणि त्या हिंदू तरुणींना मुस्लिम बनवलं जातं या विरोधात वेळोवेळी भारतीय जनता पक्षाने आवाज उठवला आहे. त्यामुळेच आता धर्मांतर कायदा लवकरात लवकर व्हावा, अशी मागणी भारतीय महिला मोर्चाच्या अध्यक्षा शितल गंभीर देसाई यांनी केली आहे.

श्रध्दाला न्याय मिळण्याची मागणी -वसईत राहणाऱ्या श्रद्धा वालकर या तरुणीची हत्या तिचा प्रियकर आफताब पूनावाला यांनी दिल्लीत केली आफताब याने अत्यंत निघून पणे श्रद्धाच्या मृतदेहाचे 35 तुकडे केले ते तुकडे दिल्लीच्या विविध भागात रात्रीच्या अंधारात त्याच्याकडून फेकण्यात आले याची आता संपूर्ण चौकशी दिल्ली पोलिसांकडून सुरू आहे मात्र घडलेल्या या घटनेनंतर महाराष्ट्रासहित संपूर्ण देशभर संताप व्यक्त केला जात आहे. त्यामुळेच श्रद्धा वालकर या तरुणीला लवकरात लवकर अन्याय मिळावा, या मागणीसाठी भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चाच्या वतीने दादर भागांमध्ये आंदोलन करण्यात आले होते.

ABOUT THE AUTHOR

...view details