पुणे- पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पक्षाला 200 च्या पुढे जागा मिळणार आहे आणि यंदा भारतीय जनता पक्षाची सत्ता येणार आहे, असे मत केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले. पुण्यात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या पश्चिम महाराष्ट्रातील कार्यकारिणीची बैठक आयोजित करण्यात आली होती. यादरम्यान आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
यंदा भाजपची सत्ता येणार -
पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी विरुद्ध वातावरण तयार झाले आहे. ममता बॅनर्जी भाजपवर चिडल्या आहे. म्हणूनच भाजपचे अध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्यावर हल्ला केला आहे. पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या 294 जागांपैकी 200 च्यावर जागा भाजप जिंकणार आहे आणि यंदा भाजपची सत्ता पश्चिम बंगालमध्ये येणार आहे, असे मत मंत्री आठवले यांनी व्यक्त केले.